पोटदुखीपासून तर कानदुखीपर्यंत, जाणून घ्या पावटा खाण्याचे ‘हे’ 7 गुणकारी फायदे !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   पावटा अनेकांना आवडतो. काही लोक पावटा खाणं टाळतात, कारण त्यांना ही भाजी आवडत नाही. परंतु याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. पोटदुखीपासून तर कानदुखीपर्यंत पावटा अनेक आजारांवर गुणकारी आहे. आज आपण पावट्याच्या शेंगा किंवा त्याच्या भाजीचे शरीराला कोणते फायदे होतात याची माहिती घेणार आहोत.

पावटा खाण्याचे फायदे पुढीलप्रमाणे –

1) आम्लपित्ताच्या त्रासानं पोटात जळजळ होत असेल तर पावट्याच्या शेंगांचा काढा प्यावा.

2) अनेकदा स्त्रियांना मासिक पाळीत त्रास होतो. अशा वेळी पावटा किंवा पवाट्याच्या शेंगांचा काढा उपयोगी ठरतो.

3) भूक कमी लागणं, अपचन होणं अशा काही समस्या असतील तर पावट्याचं सेवन करावं.

4) ताप कमी करण्यासाठी पावट्याचा रस प्यावा. यामुळं फायदा मिळेल.

5) ओटीपोट किंवा कंबरदुखीचा त्रास जाणवत असेल तर तो कमी करण्यासाठी पावट्याची भाजी नियमितपणे खावी.

6) जुनी जखम किंवा शरीराच्या एखाद्या भागावर वेदना जाणवत असेल तर पावट्याची भाजी खावी.

7) कान ठणकत असेल तर अशा वेळी पावट्याचा रस गाळून त्याचे 2 थेंब कानात टाकावेत. यामुळं ठणक लगेच कमी होतो.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.