केवळ डोळेच नव्हे, तुमची त्वचा सुद्धा प्रभावित करतोय तुमचा स्मार्टफोन, जाणून घ्या कसे

नवी दिल्ली : मागील एक वर्षात कोरोना व्हायरस महामारी दरम्यान स्मार्टफोनचा वापर खुपच वाढला आहे. महामारीदरम्यान वर्क फ्रॉम होम, शाळा आणि मनोरंजनासाठी लोक स्मार्टफोन, मोबाईल, टीव्ही आणि लॅपटॉपचा वापर अगोदरच्या तुलनेत अनेकपटींने जास्त करत आहेत. इंडियन एक्सप्रेसनुसार, इंडियन टेक्नॉलॉजी रिसर्च फर्म (सीएमएस) च्या कडून कंडक्ट करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये हे आढळले आहे की, 2019 मध्ये जे लोक दिवसभरात 4.9 तास स्क्रीनवर घालवत होते ते यावर्षी मार्चपर्यंत 5.5 तास घालवत आहेत. मात्र, ज्या लोकांचा डेस्क जॉब आहे ते 10 ते 12 तासापर्यंत स्क्रीन समोर सतत बसून काम करत आहेत. ज्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होत आहे.

डोळ्यांशिवाय त्वचेलाही करत आहे प्रभावित
आतापर्यंत स्क्रीनच्या साईड इफेक्टसच्या बाबतीत आपण हे ऐकत आलो होतो की, याच्या अतिवापराने डोळ्यांतून पाणी येणे, डोकेदुखी, पाठदुखी इत्यादी समस्या वाढतात, परंतु तुम्हाला हे माहित आहे का, तुमच्या स्कीनसाठी सुद्धा हे हानिकारक आहे. यातून निघणार्‍या ब्लू लाईटमुळे तुमच्या चेहर्‍यावर पिगमेंटेशन, एजिंग सारख्या समस्या वेगाने वाढतात.

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना प्रसिद्ध कॉस्मेटिक सर्जन डॉ. करिश्मा कागोडू यांनी सांगितले की, स्मार्टफोन, टॅबलेट, टीव्ही, एलसीडी स्क्रीन, एलईडी बल्ब इत्यादीतून निघणारी ब्लू लाईट्स अथवा हाय एनर्जी व्हिजिबल लाईट्समध्ये हाय फ्रिक्वेन्सी असते आणि शॉटवेव्ह लेंथ लाईट्समध्ये व्हॉयलेट/ ब्लू रेज निघतात. ते स्कीनवर पिग्मेंटेशन, टॅनिंग आणि एजिंगचे कारण ठरतात. इतकेच नव्हे, नवीन स्मार्टफोन्समध्ये ब्लू लाईटची फ्रिक्वेन्सी जास्त असते ज्यामुळे बॉडी सेल्सची फोटो सेंसिटिव्हिटी सुद्धा वाढते.

हे आहेत उपाय
– मोबाइल, लॅपटॉप इत्यादीवर ब्लू लाईट शील्ड लावा.
– डार्क मोड किंवा नाईट मोडचा जास्त वापर करा.
– झिंक ऑक्साईड आणि टिटेनियम डाय ऑक्साईडच्या सनस्क्रीनचा घरात सुद्धा वापर करा.
– गाजराच्या बी च्या तेलाचा वापर स्कीन केयर रुटीनमध्ये करा.
– व्हिटॅमिन सी सीरमचा वापर करा.
– जास्त पाणी प्या.
– अँटीऑक्सीडेंट फूड जेवणात जास्त सेवन करा.