Weight Control Drinks : जर शरीराला ‘डिटॉक्स’ करायचे असेल तर या ‘नाईट ड्रिंक्स’चा करा वापर, वजनावरही राहील नियंत्रण

पोलीसनामा ऑनलाईन : वाढत्या वजनाने त्रस्त असाल तर सर्वात आधी आपल्या आहाराबाबत काही नियमांचे पालन करावे. आपल्या भारतीयांना सवय आहे की आपण सकाळचा नाश्ता स्किप करतो आणि लंच आणि नाश्ता सोबतच करतो आणि रात्री हेवी डिनर करतो. आपली ही सवय वाढत्या वजनाला कारणीभूत आहे.

वजन नियंत्रणात आणण्यासाठी सर्वात आधी आपण डायट रुटीन सुधारले पाहिजे, रात्रीचे जेवण 8 च्या आधी करून घ्यावे. तसेच वजन कमी करण्यासाठी आपण रात्री बेडटाईम ड्रिंक्स घेऊ शकता. अशी अनेक पेय आहेत ज्यांचा रात्री वापर करून आपण वजन कमी करू शकतात. आज आपण अशा दोन ड्रिंक्सबाबत जाणून घेऊया ज्यामुळे आपले वजन कमी होईल. यांना बनवणे अगदी सोपे आहे. हे ड्रिंक्स फक्त आपले वजनच कमी करणार नाहीत तर आपल्या बॉडीला देखील डिटॉक्स करतील.

काकडी आणि ओव्याची स्मूदी:

काकडी आणि ओवा उन्हाळ्यातील आवश्यक घटक आहेत ज्यात भरपूर प्रमाणात हायड्रेटिंग घटक असतात. उन्हाळ्यात जेव्हा तुम्हाला फुगल्यासारखे वाटते किंवा काहीही खाण्याची इच्छा नसते तेव्हा काकडी आणि ओव्याचा रस प्या. हे आपल्या शरीराला डिटॉक्स करेल आणि आपल्या चयापचयात सुधार करेल. काकडी आणि ओव्याचा रस आपले वजन कमी करण्यास देखील मदत करतो. यामुळे शुगर नियंत्रित राहते तसेच पचनक्रिया देखील सुधारते. इतकेच नाही तर यामुळे शरीरातून विषारी द्रव्य आणि अतिरिक्त द्रवपदार्थ बाहेर काढण्यास मदत होते.

काकडीची स्मूदी कशी बनवावी

काकडी, लिंबाचा रस आणि ओव्याच्या साहाय्याने काकडीची स्मूदी बनविली जाते. एका ब्लेंडरमध्ये चिरलेली काकडी आणि ओवा टाकावा आणि त्यास चांगल्या पद्धतीने ब्लेंडर करावे. चवीसाठी आपण यात लिंबाचा रस टाकावा.

मेथीचे पेय:

आपल्या स्वयंपाकघरात मेथी ही नेहमी आढळते जी तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मेथीमुळे आपली पचनक्रिया सुधारते आणि शरीरातून चरबी देखील कमी होते. मेथीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म देखील आढळतात. दिवसा केव्हाही एक ग्लास मेथीचे पाणी पिल्याने शरीराची प्रतिकार क्षमता वाढू शकते.

बनवण्याची पद्धत

एक वाटी पाणी उकळवा आणि जेव्हा पाणी उकळेल तेव्हा त्यात एक चमचा मेथीचे दाणे घाला. मेथीच्या दाण्यांचा रंग हलका होईपर्यंत त्यास उकळवा. नंतर त्यांना एका कपमध्ये काढावे आणि प्यावे. याची चव वाढवण्यासाठी यात गूळ पावडर घालू शकता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like