नॉन-स्टिक भांडी वापरल्याने होऊ शकतो फुफ्फुसांचा आजार, ‘या’ 4 प्रकारे घ्या काळजी

पोलीसनामा ऑनलाइन – आरोग्याच्या बाबतीत जागरूक असलेले अनेक लोक तेल कमी सेवन करण्याच्या हेतून जेवण बनवण्यासाठी नॉन-स्टिक भांड्यांचा वापर करतात. तुम्ही सुद्धा अशा भांड्यांचा वापर करत असाल. परंतु, या भांड्यांच्या वापराने कॅन्सरसारख्या गंभीर आजारासह लंग डॅमेजचा सुद्धा धोका असतो. जाणून घेवूयात काय आहे सत्य…

नॉन-स्टिक भांड्यांवर टेफ्लॉन कोटींग असते, ज्यास पॉली टेट्राफ्लूरोएथिलिन म्हटले जाते. टेफ्लॉनची निर्मिती पीएफओए (परफ्ल्यूओरूक्टॅनिक अ‍ॅसिड) पासून केली जाते. हा एक विषारी पदार्थ आहे. याचे नुकसान समोर आल्यानंतर आता नॉन-स्टिक भांड्यांमध्ये जेनएक्सचा वापर होऊ लागला आहे.

याच कारणामुळे सध्या नॉन स्टिक भांड्यांवर लिहिले असते की, ती पीएफओए-फ्री आहेत. मात्र, याऐवजी जे अन्य मटेरियल वापरले जात आहे, ते सुद्धा आरोग्यासाठी नुकसानकारक सिद्ध होत आहे. जाणून घेऊयात कसे…

टेफ्लॉन एक सेफ कंपाऊंड आहे, जे आरोग्यासाठी हानिकारक आहे. परंतु, 300 डिग्री सेल्सियसच्या तापमानावर नॉन-स्टिक भांड्यावर लावलेले टेफ्लॉन कोटिंग निघू लागते. ज्यामुळे हवेत प्रदुषण केमिकल निर्माण होते.

हा धूर नाकात गेल्याने पॉलीमर फ्यूम फीव्हर किंवा टेफ्लॉन फ्लू सुद्धा होऊ शकतो. यामध्ये थंडी लागणे, ताप येणे, डोकेदुखी आणि अंगदुखी अशी लक्षणे दिसतात. स्टडीमध्ये असेच निष्कर्ष समोर आले, ज्यामध्ये टेफ्लॉन जास्त गरम झाल्याने लंग डॅमेज (फुफ्फुस खराब होणे) होत असल्याचे दिसून आले.

नॉन स्टिक भांड्याचा वापर करताना अशी घ्या काळजी
1 नॉन स्टिक पॅन प्री-हीट करू नका.
2 हे गरम होण्यापूर्वी त्यामध्ये खाद्य किंवा द्रव पदार्थ टाका.
3 जास्त तापमानावर जेवण बनवू नका.
4 या भांड्यांमध्ये नेहमी लाकडाचा चमचा वापरा.