ऑक्सफर्डच्या संशोधनात दावा : कोरोनातून ‘रिकव्हर’ झाल्यानंतर लोकांना होतेय हार्ट आणि बीपीची समस्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना संसर्गातून रिकव्हर झाल्यानंतर लोक आरोग्याच्या इतर अनेक समस्यांचा सामना करत आहेत. कमजोरी, थकवा तसेच ब्लॅक फंगसची समस्या सुद्धा दिसून येत आहे ज्यामुळे दृष्टी जात आहे. आता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या एका संशोधनात आढळले आहे की, कोरोनातून बरे झालेल्या लोकांमध्ये हार्ट अटॅकची समस्या दिसून येत आहे. यामुळे कोरोनातून बरे झाल्यानंतर सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे. याची कारण, लक्षणे आणि बचावाची पद्धत जाणून घेवूयात…

काय आहेत कारणे
– एक्सपर्टचे म्हणणे आहे की, कोरोना संसर्ग व्यक्तीच्या हार्टवर सुद्धा परिणाम करतो ज्यामुळे हार्ट अटॅकची शक्यता असते.
– इतकेच नव्हे, रिकव्हर रूग्णाना हाय आणि लो ब्लड प्रेशरसारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
– एक्सपर्टनुसार, कोविड-19 चा संसर्ग शरीराच्या इंफ्लेमेशनला ट्रिगर करतो, जसे ह्रदयाच्या मांसपेशी कमजोर होऊ लागतात.
– याशिवाय हार्ट बीटला सुद्धा करतो. यामुळे रक्त गोठण्याची समस्या होते. कोरोनामुळे हार्टच्या मांसपेशी कमजोर पडतात.
– हार्टमध्ये इन्फ्लेमेशन वाढल्याने असे होते. यामध्ये हार्ट फेलियर, ब्लड प्रेशरच्या समस्या आणि धडधड वेगाने किंवा संथ गतीने होऊ लागते.
– तसचे फुफ्फसामध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्याने हार्टवर वाईट परिणाम होतो. तरूणांमध्ये हा त्रास जास्त दिसून येत आहे.

ही आहेत लक्षणे
– रूग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो.
– हृदयाची धडधड वेगाने आणि अनियमित होते.
– सतत कमजोरी आणि थकवा जाणवतो.
– पंजा, कोपरा किंवा पायांना सूज सुद्धा येते.
– सतत खोकला, भूक न लागणे आणि वारंवार लघवी होणे.
– यापैकी कोणतेही लक्षण जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जा.