Panic Attack Cure : तुमचे विनाकारण घाबरणे पैनिक डिसऑर्डर तर नाही ना ? कोराना काळात वाढलेत रुग्ण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –   पॅनिक डिसऑर्डर एक असा मानसिक आजार आहे, ज्यामुळे पीडित व्यक्ती सतत भीतीच्या छायेत राहते. या रोगाने पीडित व्यक्ती इतका घाबरलेला असतो की, त्याला प्रत्येक वेळी असे वाटते की, तो एखाद्या मोठ्या आजाराने किंवा मोठ्या समस्येने त्रस्त आहे. अशावेळी पीडित व्यक्तीचे हृदय जोरजोरात धडधडू लागते, त्याला श्वास घेण्यास अडचण येते. या आजारात ग्रस्त व्यक्ती इतका घारलेला असतो की, त्याला प्रत्येक हालचालीने भीती वाटते. कोरोना काळात अशा प्रकारच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

पॅनिक अटॅकपासून वाचण्यासाठी डाएटमध्ये करा हे बदल

1 बदाम

बदाम पॅनिक अटॅकला कमी करू शकतो. यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखी महत्त्वपूर्ण पोषक तत्त्व आणि मिनरल भरपूर प्रमाणात असतात, जी नर्वस सिस्टिमच्या कामात सुधारणा करून मेंदूसुद्धा निरोगी ठेवण्यास मदत करतात.

2 ग्रीन टी

ग्रीन टीममधील अँटीऑक्सिडंट आणि पॉलीफिनॉल मेंदूचा तणाव कमी करणे आणि मोनोमाइन ऑक्सिडेजच्या हालचाली कमी करून मेंदूच्या पेशी आणि ऊती निरोगी ठेवण्यास मदत करते.

3 संत्रे

संत्रे व्हिटॅमिन सीचा स्राेत असल्याने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते, सोबतच पॅनिक अटॅकसुद्धा कमी करते. न्यूरॉन्सला शांत करण्यास मदत करते.

4 कॉगनिटिव्ह -बिहेवियरल थेरेपी

ही थेरेपी आणि औषधांच्या माध्यमातून पॅनिक अटॅकचा उपचार केला जातो. यासाठी चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. दारू आणि कॉफी सेवन करू नका.

या उपायांनी मिळेल ताबडतोब आराम

जेव्हा अचानक घाबरल्यासारखे वाटले किंवा चक्कर येऊ लागेल तेव्हा दीर्घश्वास घेण्यास सुरुवात करा.

नाकातून लवकर श्वास घ्या, यानंतर श्वास थोडासा रोखून पुन्हा दीर्घ-दीर्घ श्वास घ्या.

तोंडानेसुद्धा ऑक्सिजन घेण्याचा प्रयत्न करा. काहीवेळ तोंडात श्वास रोखून पुन्हा तोंडात ऑक्सिजन भरा.

मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका.