Coronavirus : ‘कोरोना’च्या ‘फोबिया’मुळं नागरिक ‘डिप्रेशन’चे ‘शिकार’,बचावासाठी ‘हे’ 6 उपाय, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूमुळे नागरिकांमध्ये घबराहट आणि भीती आहे. घरातील मुल, वृद्ध आणि तरुणांना या रोगाविषयी चिंता वाटू लागली आहे. यामुळे काही लोकांवर डिप्रेशन येऊ लागले आहे. सामाजिक अंतराने देखील लोकांना डिप्रेशन येऊ लागले आहे. सध्या मित्रांमध्ये, परिवारासोबत बसणे गुन्हा ठरत आहे. वातावरण एवढे बिघडले आहे की, एखाद्याला साधी शिंक जरी आली तरी त्याच्याकडे संशयाने बघितले जाते. जसे की याला देखील कोरना संसर्ग झाला आहे. या रोगाच्या भीतीमुळे लोक एवढे डिप्रेशनमध्ये आले आहेत की एक निरोगी व्यक्ती देखील सामान्य फ्लूला कोरोनाचा आजार मानू लगाला आहे.

सध्या कोरोना संक्रमण लोकांचा मानसिक आजार बनला आहे. सोशल डिस्टेंसिंगने डिप्रेशन या आजाराला जन्म दिला आहे. आपण सध्या समाज आणि लोकांपासून दूर रहात आहोत. यामुळे आपल्याला आपण अशक्त असल्याचे वाटू लागले आहे. काही ठिकाणी भीती एवढी वाढली आहे की, लोक क्वारंटाईनपासून दूर पळत आहेत. फ्ल्यूची लक्षण आढळून आल्यानंतरही लोक डॉक्टरांकडे जाण्यास घाबरत आहेत. लॉकडाऊनमुळे लोकांना मानसिकरित्या आजारी बनवले आहे. या व्हायरसमुळे जीवित आणि मालमत्तेचे नुकसान होत आहे. या नुकसानाची भरपाई करण्यासाठी अनेक वर्षे जाणार आहेत.

काही लोक नेहमीच्या फ्ल्यूने ग्रस्त आहेत. मात्र, या लोकांना देखील हा फ्ल्यू कोरोनाचा फ्ल्यू असल्यासारखे वाटू लागले आहे. लोक कोरोनाच्या फोबियाने त्रस्त झाले आहेत. लॉकडाऊनमुळे लोकांमधे तणाव निर्माण होत आहे. म्हणूनच या रोगाचा पराभव करण्यासाठी आपल्या शरिरासोबत आपले डोके देखील शांत ठेवणे आवश्यक आहे. या डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी काही उपयायोजना अवलंबल्या पाहिजेत.त्यामुळे तुम्हाला कठीण काळात देखील आराम मिळेल.

डिप्रेशनपासून दूर राहण्याचे उपाय
1. शरिरासोबतच आपले मन देखील स्वच्छ ठेवा. कोणताही चुकीचा विचार मनात येऊ देऊ नका.
2. डिप्रेशनचे प्रमुख कारण सोशल डिस्टेंसिग आहे. डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी आपण आपल्या मित्रासोबत किंवा आपल्या प्रिय व्यक्तिसोबत फोनवर बोलणे महत्त्वाचे आहे.
3. कोरोनाच्या बातम्यांमुळे तुमच्यात फोबिया उद्भवतो. म्हणूनच आपण या बातम्यापासून लांब राहिले पाहिजे आणि मनोरंजनाचे चॅनल पाहिले पाहिजेत.
4. घरामध्ये आराम करणे आपल्या आवडीचे पदार्थ बनवणे, आपल्या कुत्र्यासोबत खेळणे, घरातील व्यक्तींसोबत अंताक्षरी खेळणे यामुळे आपले डिप्रिशन कमी होण्यास मदत होते.
5. डिप्रेशनपासून दूर राहण्यासाठी पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा.
6. नैसर्गिक गोष्टीमध्ये आवड निर्माण करा, जसे वृक्षारोपणाची आवड निर्माण करा, घरातच तुम्ही बागकाम करत असाल तर वेगवेगळी झाले लावा. झाडांसोबत आपला वेळ घालवा.