Pollution & Eye Infection : प्रदूषणामुळे जर डोळ्यांना त्रास किंवा ड्रायनेस वाटत असेल तर दुर्लक्ष करू नका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   लॉकडाउन उघडल्यानंतर दिल्लीसह उत्तर भारत पुन्हा एकदा वाढत्या वायू प्रदूषणाला बळी पडत आहे. वर्षाच्या सुरूवातीला लॉकडाउनमुळे दिल्ली आणि आसपासची हवा बर्‍याच वर्षांनंतर स्वच्छ दिसत होती. परंतु आता कोरोना विषाणूच्या साथीमुळे लावण्यात आलेले निर्बंध हटविले गेले असल्याने प्रदूषणही झपाट्याने वाढत आहे. आरोग्याच्या बाबतीत हे अत्यंत धोकादायक मानले जात आहे. विशेषतः मुलांसाठी, हे प्रदूषण प्राणघातक असल्याचे सिद्ध होऊ शकते.

वाढत्या प्रदुषणामुळे श्वास घेण्यास त्रास होण्याव्यतिरिक्त बहुतेक लोकांना डोळ्यांची आग होण्याची समस्या होत आहे. नेत्रतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, राष्ट्रीय राजधानीत वायू प्रदूषणाची पातळी धोकादायक पातळीवर पोहोचल्यामुळे, लोकांना अॅलर्जी, डोळ्यांची आग आणि खाज सुटणे यासह विविध समस्यांचा सामना करावा लागत आहेत.

व्हिजन आय सेंटर, नवी दिल्लीचे वैद्यकीय संचालक डॉ. तुषार ग्रोव्हर यांचे म्हणणे आहे की, लॉकडाऊनमध्ये सूट मिळाल्याने शहरांमध्ये प्रदूषण पुन्हा वाढू लागले. लोकांना असे वाटते की, प्रदूषणामुळे केवळ फुफ्फुसांचे नुकसान होते. लोकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, फुफ्फुसांव्यतिरिक्त प्रदूषणामुळे डोळ्यांनाही खूप नुकसान होऊ शकते. हानिकारक प्रदूषणाचे कण डोळ्यांत शिरतात तेव्हा, विशेषत: कॉर्निया आणि डोळ्यांच्या बुबुळाला स्पर्श करतात आणि डोळ्यांना त्रास होतो. यामुळे डोळे लाल होतात आणि आग होते.

प्रदूषणामुळे डोळ्यातील कोरडे रोग होऊ शकतात. हा आजार झाल्याने आपल्याला केवळ गैरसोयीच होत नाही तर तुमची दृष्टी कमजोर होते आणि अंधुक दिसू लागते कारण डोळ्याचे अस्तर खराब झालेले असते. हिवाळ्यात, विशेषत: धुक्यामुळे कोरडे डोळे तीव्र होऊ शकतात, ज्यामुळे अश्रूची क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही खराब होऊ शकते, ज्यामुळे परिणामी आपल्या डोळ्यांना आवश्यक गोष्टी मिळत नाही.

याशिवाय डोळ्याच्या संसर्गाचा धोकाही वाढतो. म्हणूनच लोकांनी बाहेर जाताना सनग्लासेस घालणे, डोळ्यांना न चोळणे, डोळ्यांना स्पर्श करण्यापूर्वी हात धुणे, लॅपटॉप व मोबाईल वापरताना थोडावेळ ब्रेक घेणे यासारख्या सुरक्षात्मक उपायांचे पालन केले पाहिजे. त्याचबरोबर डॉक्टरांच्या सूचनेनुसार, ड्रॉप्स लुब्रिकेटेड देखील वापर करावा.