पावसाळ्यात अशी टाळा सुका खोकला आणि कफची समस्या, करा ’हे’ 7 सोपे उपाय, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – सध्या कोरोनाचा काळ सुरू असल्याने इतर सामान्य आजार होऊ नयेत म्हणून काळजी घेणे आवश्यक ठरत आहे. कारण कोरोनाची सुद्धा काही लक्षणं ही सर्दी, खोकला, ताप, कफ अशी सामन्य आजारांची आहेत. या समस्येपासून बचाव करण्यासाठी वेळीच आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. काही घरगुती उपाय करून या समस्या टाळता येतील आणि आरोग्य चांगलं ठेवता येऊ शकते. हे घरगुती उपाय कोणते ते जाणून घेवूयात…

हे उपाय करा

1 मीठ हे एक जंतूनाशक आहे. त्यामुळे गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या करा. त्यामुळे घश्यातील सुज कमी होते.

2 ग्लासने पाणी घेऊन गुळण्या करा. कोमट पाण्याचा वापर करा. गुळण्या करताना तुम्ही या पाण्यात मीठ घालू शकता.

3 गुळण्या करताना कोमट पाण्यात बेकिंग सोडा घातल्याने श्वासांमधून येणारी दुर्गधी कमी होते. गुळण्या करत असताना तोंडाची हालचाल करा. जीभ आतल्याआत सगळ्या बाजूला फिरवा. पाणी घशापर्यंत नेऊन पुन्हा पुढे आणा. अशा पद्धतीने गुळण्या करा.

4 वीस ते तीस सेकंद गुळण्या करताना पाणी तोंडात ठेवल्यानंतर सावधगिरीने पाणी बाहेर फेकून द्या. गुळण्या करून झाल्यानंतर दात स्वच्छ करा.

5 जास्तीत जास्त पाणी पिऊन स्वतःला हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा. सुका खोकला घालवण्यासाठी गरम पाण्याची वाफ घ्या. घश्याला आराम देण्यासाठी लिंबू आणि मध घातलेल्या गरम पाण्याचे सेवन करा.

6 खोकला जास्त असल्यास औषधी काढा घ्या. छातीत कफ जमा झाल्यास इतर ठिकाणी थुंकताना काळजी घ्या, अन्यथा संक्रमण पसरू शकते.

7 फुफ्फुसातील कफ मोकळा होण्यासाठी दिवसातून तीनवेळा वाफ घ्या. व्यायाम केल्याने, चालल्याने फुफ्फुसांतील कफ बाहेर पडण्यास मदत होते. दिवसातून 20 ते 30 मिनिटे व्यायाम करा.