Chikungunya Precautions : जर चिकनगुनिया झाला तर ‘ही’ खबरदारी घेणं आवश्यकच, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – चिकनगुनिया विषाणू असलेल्या डासाच्या चाव्यामुळे येणाऱ्या तापाला चिकनगुनिया असे म्हणतात. एडीस डास चावल्यामुळे चिकनगुनिया ताप येतो. जेव्हा एखादा डास तुम्हाला चावतो, तेव्हा हा विषाणू तुमच्या रक्तात प्रवेश करतो आणि तुमच्या रक्तपेशींवर परिणाम करतो, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होते आणि शरीर कमकुवत होते.

चिकनगुनिया हा शब्द मकोंड (Makonde) च्या भाषेतून आला आहे, जी मकोंडेच्या पठारावर बोलली जाते, जेथे या आजाराचा जन्म झाला. चिकनगुनियाचा अर्थ होतो ‘नतमस्तक होणे’. या आजारात सांध्यातील दुखण्यामुळे रुग्ण वाकून चालू लागतो. चिकनगुनिया बारा झाल्यानंतरही बहुतेक रुग्णांना सांध्यामध्ये वेदना होत राहतात.

वास्तविक पाऊस आणि थंडीच्या हंगामात तापमान कमी झाल्याने चिकनगुनियाचे विषाणू बाहेर येतात. गेल्या काही वर्षांत चिकनगुनिया जगातील एक चतुर्थांशपेक्षा जास्त देशांमध्ये रोग म्हणून पसरला आहे. चिकनगुनिया हे एक प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन आहे, जे मानवांमध्ये डासांच्या चाव्यामुळे होते. निश्चितच हा एक जीवघेणा आजार नाही, पण त्याची लक्षणे खूप गंभीर, दीर्घकाळ टिकणारी आणि त्रासदायक असू शकतात. चिकनगुनिया हा सहसा एडीस डासाच्या चाव्यामुळेच होतो, ज्याने आधीच एखाद्या रुग्णाला चावा घेतला आहे किंवा विषाणूचा संसर्ग झाला असेल. पण काही प्रकरणांमध्ये चिकनगुनिया एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या रक्तासहदेखील निरोगी व्यक्तीमध्ये ट्रान्समीट होऊ शकतो.

एसएमएस मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. यूएस अग्रवाल यांच्या मते, उच्च ताप, कंबर आणि सांधेदुखी, अशक्तपणा, डोकेदुखी ही चिकनगुनियाची काही विशिष्ट लक्षणे आहेत. चिकनगुनियावरील उपचारही अद्याप तयार होऊ शकले नाहीत. हा आजार जीवघेणा नसला, तरी दुर्लक्ष झाल्यामुळे या आजारने जीवही जाऊ शकतो.

ते टाळण्यासाठी आपल्याला डासांपासून सावध राहावे लागेल. दिवसा फुल बाह्यांचे शर्ट आणि पॅन्ट घालणे, तसेच डासांपासून बचाव करणारी क्रीम वापरणे, घर आणि परिसर स्वच्छ ठेवणे, घराभोवती जास्त पाणी साचू न देणे, रात्री स्वत:ला चांगले झाकून झोपणे.

या आजारात रुग्णाला बरे होण्यासाठी पुरेशी विश्रांती आवश्यक असते, म्हणून जर तुमच्या कुटुंबातील एखाद्याला आधीच चिकनगुनिया असेल तर, प्रवास पुढे ढकलावा किंवा टाळावा. पण जर प्रवास पुढे ढकलला जाऊ शकत नसेल, तर प्रतिबंध आणि सतर्कतेने कार्य केल्यास हा रोग टाळता येऊ शकतो. रुग्णाने संपूर्ण प्रवास पूर्णपणे झाकूनच केला पाहिजे. बाहेरील खाद्य पदार्थांपासून शक्य तितक्या दूर ठेवावे आणि इतरांनी देखील सावध असले पाहिजे.