Health Problems Symptoms | सकाळी उठण्याची इच्छा होत नाही, खुप आळस येतो का? मग तुमच्या आरोग्यासाठी व्हा अलर्ट

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Health Problems Symptoms | सकाळच्या झोपेची मजा काही वेगळीच असते, कुणालाच ही झोप सोडावीशी वाटत नाही. प्रत्येकाला अंथरुणावर विश्रांती घेणे आवडते. त्याच वेळी, काही लोक असे असतात ज्यांना अंथरुणातून उठण्याची अजिबात इच्छाच होत नाही आणि उशीरपर्यंत झोपून राहतात. अशावेळी आरोग्याबाबत अलर्ट व्हायला पाहिजे. हे अशक्तपणामुळे असू शकते. सकाळी उठण्याच्या या समस्येला हलक्यात घेऊ नये कारण हे एखाद्या मोठ्या समस्येचे लक्षण असू शकते (Health Problems Symptoms).

 

रोगाची लक्षणे
झोपेतून जागे होताना कोणती लक्षणे दिसल्यास आपल्याला सावध झाले पाहिजे ते जाणून घेवूयात…

 

1. डोकेदुखी (Headache)
सकाळी उठताना डोकेदुखी होत असेल तर ते त्रासाचे कारण बनू शकते. जर ही समस्या नियमितपणे होत असेल तर हे ब्रेन ट्यूमरचे लक्षण असू शकते. सकाळी उठताना होणारी डोकेदुखी स्लीप अ‍ॅनिमियाचे लक्षण असू शकते. (Health Problems Symptoms)

 

2. सांधे दुखी (Joint pain)
सकाळी उठल्यानंतर काही काळ सांधेदुखी आणि जखडल्यासारखे जाणवत असेल तर ते कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे असू शकते. सांध्यातील वेदना आणि कडकपणा हे देखील संधिवाताचे लक्षण आहे.

 

3. शरीरावर सूज
सकाळी उठताना चेहर्‍यावर सूज येणे हे जास्त सोडियममुळे होऊ शकते. यावेळी सूज येणे हे सायनसच्या समस्येमुळे देखील असू शकते.

4. थकवा
पुरेशी विश्रांती घेतल्यानंतरही उठताना थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल तर ते थायरॉईड, उच्च रक्तदाब आणि हायपोग्लायसेमियाचे लक्षण असू शकते.

 

कसा करायचा बचाव?
या लक्षणांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास धोकादायक ठरू शकते. अशा समस्या उद्भवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. परंतु या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपायांचीही मदत घेऊ शकता.

 

सांधेदुखी कमी करण्यासाठी मासे, बदाम, दुग्धजन्य पदार्थ आणि पालक यांसारखे कॅल्शियम युक्त पदार्थ खा. यासाठी तुम्ही रोज सकाळी स्ट्रेचिंग देखील करू शकता.

 

फुगण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी अधिक पॅक केलेले पदार्थ खाणे टाळावे. स्क्रीन गोष्टींचा जास्त वापर टाळा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Health Problems Symptoms | getting difficulty in getting up early could be the sign of diseases

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes Tips | ‘ही’ भाजी पाण्यात उकळून प्यायल्याने वेगाने कमी होईल Blood Sugar, वाढेल इन्सुलिन

 

Gold Price Today | सोने-चांदीच्या किंमतीत मागील आठवड्यातील घसरणीनंतर आज दिसत आहे तेजी, जाणून घ्या नवीन दर

 

Cyrus Mistry Car Accident | अपघातात सायरस मिस्त्रींचा मृत्यू, मर्सिडीज चालवणार्‍या ‘अनाहिता पंडोले‘ कोण आहेत?