COVID-19 & Pollution : घशात खवखव ‘कोरोना’मूळे किंवा प्रदूषणामुळं, जाणून घ्या सविस्तर

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   वर्षाची ती वेळ पुन्हा एकदा आली आहे, जेव्हा लोकांची सकाळ प्रदूषित आणि गुदमरलेल्या हवेसह होईल. एका ताज्या अहवालात असे नमूद केले आहे की, जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर असलेल्या दिल्लीची हवा पुन्हा धोकादायक प्रदूषणाने भरली आहे. ज्यामुळे श्वासोच्छवासाची समस्या वाढत आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूचा साथीचा रोग संपूर्ण जगात पसरला आहे, अशावेळी श्वासासंबंधित समस्या सुरू होणे, धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते. या दोन्हींची केवळ लक्षणे सामान्यच नाहीत तर एक सर्दी देखील चिंता निर्माण करू शकते. म्हणजेच, कोरडा खोकला आणि घसा खवखवणे ही अशी दोन लक्षणे आहेत जी प्रदूषणाच्या एलर्जीसह आणि कोविड -19 सह देखील दिसतात.

जाणून घेऊया कोरोना विषाणूच्या आणि प्रदूषणाच्या लक्षणांमधील फरकांबाबत :

सकाळी उठल्यावर घसा खवखवतो?

एकीकडे घसा खवखवणे आणि कोरडा खोकला हे कोविड -19 चे एक महत्त्वपूर्ण लक्षण आहे, परंतु अशा समस्या प्रदूषणामुळे होणाऱ्या संसर्गामुळे देखील होतात. हवामानातील बदलांमुळे आणि वाढत्या प्रदूषणाच्या पातळीमुळे अशी लक्षणे सामान्य आहेत, परंतु कोरोना काळात ही आणखी चिंता वाढवते.

कोविड -19 आणि प्रदूषण लक्षणांमधील फरक कसा करावा?

कोविड -19 संसर्गाच्या तपासाचा एकमेव मार्ग म्हणजे चाचणी. तसेच लक्षणांवर लक्ष देणे महत्वाचे आहे. घसा खवखवणे, ताप, गंध आणि चव कमी होणे, कोरोना विषाणूची महत्त्वपूर्ण लक्षणे आहेत. त्याच वेळी, घसा खवखवण्याव्यतिरिक्त, डोळ्यांचा संसर्ग, डोकेदुखी, सर्दी आणि नाक वाहणे देखील प्रदूषणाची लक्षणे आहेत. याशिवाय प्रदूषणामुळे होणारा संसर्ग काही दिवसात स्वतःच बरा होतो, मात्र वेळीच उपचार न केल्यास कोरोना विषाणू हा आजार गंभीर बनवू शकतो.

दरम्यान, जर आपल्याला सर्दी किंवा खोकला सारखे लक्षणे जाणवत असतील तर स्वत: ला क्वारंटाइन ठेवणे चांगले आहे, जेणेकरून आपले बाकीचे कुटुंब सुरक्षित असेल.

You might also like