‘कोरोना’ संक्रमणाच्या संकटादरम्यान ‘कोरडा’ अन् ‘ओला’ खोकल्यातील ‘फरक’ समजून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देश आणि जगभरात कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या वाढतच आहे. यापासून बचावासाठी सोशल डिस्टंसिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकांच्या मनात कोरोनाची इतकी भीती निर्माण झाली आहे की सामान्य फ्लूला देखील लोक कोरोनाची लक्षणे समजत आहेत. कारण कोरोनाची लक्षणे देखील सामान्य फ्लू सारखीच आहेत.पण एक लक्षण आपल्याला सामान्य फ्लू आणि कोरोना यातील ओळख करून द्यायला मदत करू शकते, ते म्हणजे कोरडा खोकला. कोरडा खोकला आपण कसा ओळखाल ? ओल्या खोकल्यापासून तो वेगळा कसा आहे ? हे ओळखणे महत्वाचे आहे, जेणेकरून आपण वेळेवर उपचार करू शकाल.

खोकला ही एक शरीरातील नैसर्गिक राक्षात्मक प्रतिक्रिया आहे. जे म्युकस,पराग कण, आणि धूर, धूळ यांच्या ऍलर्जी मुळे देखील होऊ शकते. सर्दी आणि फ्लूच्या दुष्परिणामांमुळे खोकला देखील होतो, परंतु बदलत्या हवामानामुळे बऱ्याच लोकांना खोकला होतो. कोरडा खोकला असल्यास छातीत किंवा श्वसनमार्गामध्ये जळजळ किंवा सूज होते . परंतु कोणताही कफ तयार होत नाही.

कोरोना व्हायरस मुळे कोरडा खोकला होतो, तो अतिशय धोकादायक असतो.  खोकता – खोकता पूर्ण पोटात आणि स्नायूंमध्ये मध्ये खूप वेदना व्हायला लागतात. कोरडा खोकला हे कोरोनाच्या सुमारे 60% प्रकरणांमध्ये एक प्रमुख लक्षण म्हणून नोंदवले गेले आहे. कोरडा खोकला ओल्या खोकल्यापेक्षा अगदी वेगळा आहे. जेव्हा खोकताना शरीरातुन कफ बाहेर येतो तेव्हा हा ओला कफ असतो.

या कोरोनाच्या काळात आपणही सावध असाल तर आपल्या आजाराची लक्षणे ताबडतोब ओळखा आणि त्वरित स्वतःवर उपचार करा. आम्ही तुम्हाला काही घरगुती उपचार देत आहोत जे तुम्हाला कोरड्या खोकल्यापासून मुक्त करू शकतात.

जर आपल्याला वाढत्या कोरोनोव्हायरस संसर्गाचा संशय आला असेल तर आपण इतर लक्षणांकडे लक्ष दिले पाहिजे जसे की ताप, चव किंवा गंधाचा अभाव, श्वास घेताना त्रास होणे आणि अतिसार सारख्या समस्या. आपणास यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे तपासणी करा.

कोरड्या खोकल्यावर उपचार आणि आराम मिळवण्यासाठी नैसर्गिक उपाय देखील उपलब्ध आहेत जे आपण घरीच अवलंबू शकता.

–गरम पाण्याच्या गुळण्या करा.
–मध आणि आले तोंडात ठेवल्यास खोकला कमी होतो.
–खोकला सतत असेल तर झोपताना उंच उशी घेऊन झोपा
–हळदीचे दूध प्या
–गरम पाण्याची वाफ घ्या
–काळी मिरी आणि मध मिसळून खाल्ल्यास देखील कोरडा खोकला दूर होतो. ४-५ मिरिची पूड बारीक करून त्यात मध घालून खा. काही दिवसांत परिणाम दिसून येईल.