Coronavirus : ‘रेमडेसिविर’ हे औषध ‘कोरोना’च्या उपचारात ठरतेय ‘गुणकारी’ : रिसर्च

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोनाच्या उपचारासाठी जगात अजून कोणतेही औषध नाही. व्हायरसला मारण्यासाठी आपल्याकडे पहिल्यापासून जी औषधे आहेत, त्यांचाच रूग्णांवर वापर केला जात आहे. या औषधांचा चांगला परिणामही दिसून येत आहे, त्यामुळेच कोरोनातून बरे होणारे रूग्णही वाढत आहेत. एका अभ्यासात ही गोष्ट समोर आली आहे की, कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येणारे रेमडेसिविर औषध गुणकारी ठरत आहे. माकडांवर करण्यात आलेल्या एका प्रयोगात दिसून आले की, अँटीव्हायरस रेमडेसिविर औषध सार्स-सीओवी-2 ने संक्रमित माकडांवर व्हायरसची मात्रा कमी करत आहे. या औषधाने या माकडांना फुफ्फुसाचा रोग होत नाही.

जर्नल नेचरमध्ये मंळवारी प्रकाशित झालेल्या संशोधनात म्हटले आहे की, कोरोना व्हायरसच्या रूग्णांना सुरूवातीलाच हे औषध दिल्याने त्यांना निमोनिया होत नाही. अमेरिकेचे नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थच्या संशोधकांना आढळले की, रेमडेसिविर व्यापक प्रमाणावर काम करत आहे आणि ते प्राण्यांमध्ये सार्स-सीओवी आणि मेर्स-सीओवीमध्ये संसर्ग रोखण्यात खुप प्रभावी ठरले आहे. या औषधांचे परिक्षण कोरोना व्हायरस संक्रमित रूग्णांवर केले जात आहे.

संशोधनकर्ते एमी डी विट आणि त्यांच्या सहकार्‍यांनी रेमडेसिविरच्या प्रभावाचा माकडांच्या जुन्या प्रजातीवर अभ्यास केला आणि त्यांना आढळले की, ज्या माकडांना हे औषध दिले, त्यांच्यामध्ये श्वाससंबंधी आजाराची लक्षणे दिसून आली नाहीत आणि त्यांच्या फुफ्फुसांचे सुद्धा कमी नुकसान झाले. संशोधनकर्त्यांनी म्हटले की, कोरोना व्हायरस संक्रमित रूग्णांमध्ये सुरूवातीच्या काळात या औषधाचा उपचार प्रभावी ठरू शकतो.

कोरोनाच्या संकटकाळात अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी रेमडेसिविर नावाच्या औषधाच्या प्रभावाचा दावा केला होता. यानंतर ट्रम्प यांनी अमेरिकेला वाचवण्यासाठी या औषधावर डाव खेळला आणि आता जपानने सुद्धा या औषधाला मंजूरी दिली आहे. अशाप्रकारे या औषधाला परवानगी देणारा जपान दुसरा देश ठरला आहे. अमेरिकेने या औषधाला कोरोनाच्या इमर्जन्सी केसमध्ये वापरण्याची परवानगी दिली होती.