Diabetes In Children : छोट्या मुलांना सुद्धा होऊ शकतो का मधुमेह ?, ‘ही’ 5 लक्षणे जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – डायबिटीज एक आजार आहे. या आजारात इन्सुलिनचे उत्सर्जन शरीरात होऊ शकत नाही. या कारणामुळे शरीरात साखरेचा स्तर वाढतो. डायबिटीज झाल्यावर वजन कमी होऊ लागते, वारंवार लघवीला होते, भूख वाढते आणि थकवा जाणवतो. डायबिटीज दोन प्रकारचे असतात. टाइप 1 डायबिटीज आणि टाइप 2 डायबिटीज.

टाइप 1 डायबिटीजमध्ये शरीरात इन्सुलिन उत्सर्जित होत नाही. हा एक असा आजार आहे, जो कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतो. यास मुलेसुद्धा अपवाद नाहीत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार टाइप 1 डायबिटीज 1 वर्ष अथवा जन्म घेणार्‍या मुलाला सुद्धा होऊ शकतो. अशावळे मुलांच्या रक्तातील साखरेच्या स्तराची तपासणी करणे जरूरी आहे. टाइप 1 डायबिटीजबाबत सविस्तर जाणून घेवूयात…

सध्या टाइप 1 डायबिटीज रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये 6 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचा सुद्धा समावेश आहे. यासाठी अमेरिकन डायबिटीज असोसिएशनने गाईडलाइन्स जारी केली आहे. यामध्ये छोट्या मुलांच्या रक्तातील साखरेची तपासणी, इन्सुलिनची देखरेख, शरीरात ग्लूकोज स्तर कायम राखण्यासाठी संतुलित आहार, आणि मुलांच्या शारीरीक सक्रियतेवर लक्ष देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

टाइप 1 डायबिटीजची लक्षणे

1 सतत लघवीला होणे

2 भूख आणि तहान लागणे

3 थकवा जाणवणे

4 स्वभाव चिडचिडा होणे

5 लघवीला दुर्गंधी येणे

हे लक्षात ठेवा
मुलांमध्ये टाइप 1 डायबिटीजची लक्षणे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डाएट आणि जीवनशैलीत बदल करा. लक्षणांकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. हे मुलांच्या भविष्यासाठी धोकादायक ठरू शकते. आनुवंशिकतेमुळे सुद्धा ही समस्या होते. अशावेळी मुलांचा आहार आणि वर्कआउटवर विशेष लक्ष द्या.