आजारापासून बचावासाठी सर्वात सुरक्षित काय, हँड ‘सॅनिटायझर’ की ‘साबण’ ?, जाणून घ्या

नवी दिल्ली : सध्या जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनापासून बचावासाठी काही उपाययोजना देखील करण्यात येत आहेत.त्यातील सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे आपले हात वेळोवेळी स्वच्छ करणं. मग ते साबणाने किंवा अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरने.परंतु अनेक लोकांना हा प्रश्न पडत आहे साबण आणि हँड सॅनिटायझर या दोघांपैकी सर्वात उपयुक्त काय ? याबाबतीत हेल्थ एक्सपर्ट्सकडून खुलासा करण्यात आला. संशोधकांचं म्हणणं आहे की, कोरोनापासून बचाव करण्यासाठी सॅनिटायझरऐवजी साबणाचा वापर करणं अधिक फायदेशीर आहे. तसेच हे आर्थिकदृष्ट्याही फायद्याचं आहे.

अमेरिकेतील सीमन्स यूनिवर्सिटीतील हायजीन प्रोफेसर एलिझाबेथ स्कॉट यांच्याकडून करण्यात आलेल्या संशोधनानुसार, हात स्वच्छ करण्यासाठी साबण आणि पाण्याने धुतल्यानंतर टॉवेलला पुसणं सर्वात उत्तम उपाय आहे. त्यांचे असे मत आहे कि असं केल्याने साबण आपल्या हातांवर लागलेले सर्व बॅक्टेरिया नष्ट करण्यासोबतच हातांची त्वचाही कोरडी करतो, त्यामुळे त्यानंतर लगेच आपल्या हातांवर व्हायरस चिटकत नाही त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.

हेल्थ एक्सपर्टच्या म्हण्यानुसार, पाण्याची कोंणतीही व्यवस्था नसेल तरच हात धुण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करावा.तसेच सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचं प्रमाण सर्वाधिक असतं. 60 टक्क्यांहून अधिक अल्कोहोल असणाऱ्या सॅनिटायझरमुळे हातांची जळजळ होऊ शकते. तसेच सॅनिटायझर, साबण यांच्या तुलनेत कोरोना व्हायरससोबतच रायनोव्हायरस सारख्या नॉन एनवलप्ड व्हायरसवर कोणताच परिणाम होत नाही. तसेच लोकांना स्वच्छतेबाबत जागृत करण्यासाठी दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी ग्लोबल हँडवॉश डे साजरा करण्यात येतो. सध्या संपूर्ण जगभरात फैलावलेल्या कोरोना महामारीमुळे लोकांना स्वच्छतेचं अधिक प्रमाणात पटलं आहे.