Risk Of Mucormycosis : ‘या’ लोकांमध्ये ब्लॅक, व्हाईट आणि Yellow फंगस होण्याचा जास्त धोका, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात मागील काही आठवड्यात फंगल इन्फेक्शनची प्रकरणे वेगाने वाढली आहेत. भारताच्या अनेक राज्यांनी ब्लॅक फंगसला एपीडेमिक घोषित केले आहे. मात्र, म्यूकोर-मायकोसिस असामान्य किंवा नवीन आजार नाही, परंतु कोविड-19 महामारीत दुसरा संसर्ग वेगाने पसरणे, उच्च मृत्यूदर आणि अँटीफंगल औषधे उपलब्ध न होणे, हे सर्व लोकांमध्ये ब्लॅक फंगसबाबत भीती निर्माण करत आहे.

असे नाही की, म्यूकोर्मिकोसिस प्रत्येक व्यक्तीला प्रभावित करत नाही, परंतु हा आजार त्या लोकांसाठी गंभीर आणि जीवघेणा ठरू शकतो, जे अगोदरपासून आरोग्य समस्या आणि मोठ्या समस्यांनी त्रस्त आहेत. ज्या लोकांची इम्यूनिटी यावेळी काही कारणामुळे कमजोर आहे, त्यांना फंगल संसर्ग होऊ शकतो. ब्लॅक फंगस इन्फेक्शनपासून बचावासाठी कोणत्या लोकांनी खबरदारी घेतली पाहिजे ते जाणून घेवूयात…

1 अनियंत्रित मधुमेह
हाय ब्लड शुगर लेव्हल किंवा अनियंत्रित मधुमेहाने पीडित लोकांना सर्वात जास्त जोखीम असते. डायबिटीज गंभीर प्रकारे सूज वाढवतो, प्रतिकारशक्ती कमी करतो, तर उच्च ग्लूकोज स्तर फंगसला शरीरात सहज प्रवेश करण्यास, वाढण्यास मदत करतो. तसेच जखम असेल तर जोखीम आणखी वाढते.

2 कमज़ोर इम्यून सिस्टम
काही अशा स्थिती, ज्यामध्ये ऑटोइम्यून आजार जो प्रतिकारशक्ती बाधीत करतो अशावेळी हा आजार होऊ शकतो. ब्लॅक फंगस शरीरात तेव्हा पसरतो जेव्हा एखादा व्यक्ती हवा किंवा दुषित भागात श्वासाद्वारे ते आत घेतो. इम्युनिटी कमजोर असणार्‍यांनी जास्त काळजी घ्यावी.

3 एचआयव्ही-एड्स
रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रानुसार (सीडीसी) इम्यून सिस्टमला रोखण्यात एचआयव्ही-एड्सचे मोठे योगदान असते. एचआयव्ही पीडित व्यक्तीला हा आजार सहज होऊ शकतो. यामुळे मृत्यूदर वाढण्याचा सुद्धा धोका आहे. कॅन्सरशी लढत असलेले किंवा लढलेले, स्टेरॉईडचा वापर केलेले यांनाही मोठी जोखीम आहे.

4 कोविड-19 मधून रिकव्हर झालेले
यावेळी ब्लॅक आणि व्हाईट फंगसची प्रकरणे त्या लोकांमध्ये जास्त दिसत आहेत जे नुकतेच कोविड-19 मधून रिकव्हर झाले आहेत किंवा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत.

5 किडनीसंबंधी आजार
किडनीचे नुकसान तुमच्या प्रतिकारशक्तीला खराब करू शकते, यामुळे सिस्टम कमजोर होऊ शकते. यामुळे जावाणू आणि विषाणूसाठी प्रवेश करणे आणि नुकसानीचे कारण बनू शकते.