घामाच्या वासानं परेशान होऊन डिओड्रंटचा वापर करता का ? ‘असं’ पडू शकतं महागात ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  शरीराचा दुर्गंध किंवा घामाच्या वासापासून वाचण्यासाठी अनेक लोक डिओड्रंटचा वापर करतात. पंरतु यामुळं होणाऱ्या आजारांकडे कोणीही सहसा लक्ष देत नाही. तुम्हाला माहित आहे का यात असणाऱ्या अ‍ॅल्युमिनियम क्लोरोहायड्रेटमुळं कॅन्सरसारखा गंभीर आजार होऊ शकतो. अॅल्युमिनियम क्लोरोहायड्रेट हेच घाम रोखण्यासाठी यात मिसळलेलं असतं. त्यामुळं याचा वापर करताना काही गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. याशिवाय याचा वापरही जपून करायला हवा.

डिओड्रंटचा वापर जास्त करून छातीवर आणि काखेत केला जातो. यातील केमिकलयुक्त अॅल्युमिनियम क्लोरोहायड्रेटमुळं ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. याशिवाय याच्या सततच्या वापरानं त्वचा रोग किंवा अॅलर्जी तसेच त्वचेचा कॅन्सर होण्याचाही धोका असतो. त्यामुळं महिलांनी ब्रेस्ट कॅन्सरपासून वाचण्यासाठी याचा वापर करताना काळजी घ्यायला हवी.

इतकंच नाही तर सतत डिओड्रंटचा वापर केल्यानं तुम्हाला अल्जायमर या आजाराचाही धोका असतो. डिओड्रंटमधील अॅल्युमिनियमुळं हा आजार होतो. तसं पाहिलं तर हा एक प्रकारचा डिमेंशन असलेला आजार आहे. वयाची 60 वर्षे पार केलेल्या लोकांना हा आजार होत असतो. ही बाब जरी सिद्ध झाली नसली तरी यावर संशोधन सुरू आहे.

तुम्ही जे ब्युटी प्रॉडक्ट्स रोज वापरता त्यात पॅराबेन्स नावाचा घटक असतो. यामुळंही कॅन्सरचा धोका असतो. त्यामुळं केमिकलयुक्त प्रॉडक्ट्सचा वापर करताना जरा विचार करावा.

नॅचरल डिओड्रंट घामाला जास्त रोखू शकत नाहीत. डिओड्रंटच्या वापरामुळं ब्रेस्ट टिश्यु प्रभावित होतात. कारण यात केमिकल्सचं प्रमाण जास्त असतं. तसं पाहिलं तर यावर कोणतंही ठोस संशोधन झालेलं नाही तरीही आपण केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स वापरताना काळजी घ्यायला हवी जेणेकरून आपण गंभीर आजारांपासून दूर राहू.