जास्त मीठ खाल्ल्याने होतात ‘हे’ 8 गंभीर आजार, ‘या’ 4 उपायांनी कमी करा ही सवय !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : जास्त मीठ खाणे आणि जेवणात वरून मीठ खाणे ही सवय तुम्हाला गंभीर आजाराकडे घेऊन जाऊ शकते. यासाठी डॉक्टर योग्यप्रमाणात मीठ सेवन करण्याचा सल्ला नेहमी देतात. ज्यांना जास्त मीठाची इतकी सवय झालेली असते त्यांना योग्य प्रमाणात मीठ असूनही ते कमी वाटते. ही सवय सोडायची असेल तर कोणते उपाय करावेत आणि जास्त मीठ खाण्याचे कोणते धोके आहेत ते जाणून घेवूयात…

हे आहेत धोके
1 ब्लड प्रेशर जस्त होऊ शकते.
2 शरीरात डिहाइड्रेशन होऊ शकते. हार्ट आणि नसांवर याचा गंभीर परिणाम होतो.
3 हार्ट अटॅक आणि रक्त गोठण्याची समस्या होऊ शकते.
4 हीमोफिलियाच्या रूग्णांमध्ये रक्त खुप पातळ होते.
5 आतड्यांचा कॅन्सर होऊ शकतो.
6 किडनी रोग, किडनी स्टोनची समस्या होऊ शकते.
7 डोकेदुखी आणि शरीरात सूज येऊ शकते.
8 लठ्ठपणाचा मोठा धोका असू शकतो.

अशाप्रकारे करा सवयीवर कंट्रोल
1 मीठाऐवजी जेवणात ओनियन पावडर, गार्लिक पावडर, काळी मिरी, जायफळ, जीरे, करी पावडर, आले, कोथेंबिर, तमालपत्ता, ओव्याची पाने यांचा वापर करू शकता.

2 दुधापासून तयार पदार्थांमध्ये बदल करा. बटर आणि चीजमध्ये बदल करा. मोजरेला चीजचा वापर करा, यामध्ये सोडियम मात्रा कमी असते. साधे बटर वापरा.

3 कोथेंबिर, पुदिना, ओव्याची पाने, तुळशीपाने एकत्र वाटून घ्या. यास हर्ब सॉल्ट म्हणता येईल. हे बाजारात सुद्धा मिळते, याचा वापर करा.

4 काळी मिरीची पावडर आणि लाल मिरचीच्या पावडरचा डबा नेहमी टेबलवर ठेवा.