Coronavrius : दिलासादायक ! COVID-19 च्या उपचारासाठी मदत करणार्‍या अणूंचा शास्त्रज्ञांनी लावला

नवी दिल्ली : कोविड-19 एक नवीन व्हायरस आहे, ज्याला जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञ दररोज नवनवीन शोध करून माहिती गोळा करत आहेत. आता संशोधकांनी अणूंची एक श्रृंखला शोधली आहे, जी संभाव्य पद्धतीने त्या प्रोटीनला नष्ट करू शकते, ज्याच्या आधाराने कोरोना व्हायरस शरीरात पसरतो. या अणूंच्या ओळखीने कोविड-19च्या उपाचारासाठी नवीन औषध बनवण्यास मदत होणार आहे.

अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनुसार, सार्स-कोव-2 व्हायरस ‘पॉलीमरेज’ नावाच्या एका प्रोटीनच्या आधाराने वेगाने स्वताची संख्या वाढवतो आणि पूर्ण शरीरात पसरतो. शरीरात ‘पॉलीमरेज’ची प्रतिक्रिय बंद केल्यास कोरोना व्हायरसचा शरीरातील प्रसार थांबू शकतो. अशा परिस्थितीत शरीरात प्रतिकारशक्ती सक्रिय होते आणि कोरोना व्हायरसला मारते. हा शोध अँटीव्हायरस जनरलमध्ये प्रकाशित झाला आहे. या शोधात अनेक अशा संभाव्य अणूंच्या बाबत सांगितले गेले आहे, जे ‘पॉलीमरेज’ प्रतिक्रियेला ब्लाम करू शकतात. आता शास्त्रज्ञ हे प्रोटीन नष्ट करण्यासाठी औषध बनवत आहेत.

शास्त्रज्ञांनी शोधलेल्या अणुंपैकी काही अणूंचा वापर अगोदरच अनेक व्हायरल संसर्गाच्या उपचारात करण्यात आला आहे. शास्त्रज्ञांनी म्हटले की, काही अणू एचआयव्ही आणि हेपाटाइटीस बी च्या उपचारात वापरले जात आहेत. एका जुन्या संशोधनात शास्त्रज्ञांना आढळले होते की, सोफोसबुवीरमध्ये असलेला ट्रायफोसफेट नावाचा अणू ‘पॉलीमरेज’ प्रतिक्रियेला बंद करण्यात उपयोगी ठरू शकतो.

सोफोसबुवीरसह चार अणू ‘पॉलीमरेज’ चेन प्रतिक्रियेला तोडण्यात यशस्वी ठरला आहे. सहा आणखी अशाच अणूंचा शोध घेण्यात आला आहे. शास्त्रज्ञांनी म्हटले की, त्यांना आशा आहे की, या अणूंच्या मदतीने कोविड-19 च्या उपचारासाठी परिणामकारक औषध बनवात येऊ शकते.