Covid-19 Vaccine Registration : कोविड व्हॅक्सीन बुक करण्यासाठी अत्यंत सोप्या ‘ट्रिक्स’ आणि ‘टिप्स’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा कहर पहाता लोकांना लवकरात लवकर व्हॅक्सीन घ्यायची आहे. ज्यामुळे व्हॅक्सीन स्लॉट मिळणे खुप आवघड होत आहे. तुम्हाला व्हॅक्सीनसाठी अगोदर उेथळप वर जाऊन रजिस्टर करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला व्हॅक्सीन मिळेल. परंतु सर्वात अवघड काम रजिस्ट्रेशन करणेच आहे, कारण स्लॉट आता सहजपणे उपलब्ध होत नाहीत. तुम्ही सुद्धा व्हॅक्सीन स्लॉटसाठी अस्वस्थ असाल तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काही ट्रिक्स ज्यांच्या मदतीने तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता.

या अ‍ॅप्सच्या मदतीने करा बुकिंग

Under45.in
टेलीग्राम मेसेजिंग अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही अलर्ट सेट करू शकता. जेव्हा तुमच्या परिसरात व्हॅक्सीनसाठी स्लॉट रिकामा होईल, तुम्हाला अलर्ट येईल. येथे आपले राज्य आणि शहर निवडा. नंतर अ‍ॅलर्ट येत राहील.

Getjab.in
हा सुद्धा खास प्लॅटफॉर्म असून येथे व्हॅक्सीनच्या उपलब्धतेची सर्व माहिती मिळेल. या प्लॅटफॉर्मची सुरुवात आयएसबीच्या अल्यूमिनी श्याम सुंदर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केली आहे. यात मागितलेली माहिती भरा.

Paytm
हे पेटीएमने लाँच केले आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या क्षेत्रातील व्हॅक्सीनची उपलब्धता जाणून घेवू शकता. यासाठी पेटीएम अ‍ॅपवर उघडा, यात खाली मिनी अ‍ॅप स्टोअर सेक्शन दिसेल. येथे जा आणि व्हॅक्सीन फायंडर ऑपशनवर क्लिक करा. सर्व डिटेल्स भरा. जर व्हॅक्सीन उपलब्ध नसेल तर ’नोटिफाय मी व्हेन स्लॉट्स अव्हेलेबल’च्या ऑपशनवर क्लिक करा.

Covialerts.in
या नोटीफिकेशन सिस्टम साठी http://covialerts.in वर जा आणि आपल्या डिटेल्स भरा.

Vaccinateme.in
हे फिटनेस अ‍ॅप ’हेल्दीफाईमी’ने जारी केले आहे. यात पिन कोड आणि जिल्ह्याचे नाव टाकून स्लॉटची माहिती मिळवू शकता. ’नोटिफाय मी व्हेन स्लॉट्स अव्हेलेबल’ ऑपशन निवडू शकता.

My Government Corona Helpdesk
व्हॉट्सअपद्वारे सुद्धा तुम्ही व्हॅक्सीन उपलब्धतेची माहिती घेऊ शकता. यासाठी तुम्हाला MyGov Corona Helpdesk च्या चॅटबोटमध्ये जावे लागेल. हे मागच्या वर्षी मार्चमध्ये लाँच केले होते. येथून माहिती मिळवण्यासाठी 9013151515 नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ह करा. यानंतर तुम्ही या नंबरवर हॅलो लिहून पाठवा आणि नंतर सहजपणे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवा. हे हिंदीत सुद्धा वापरू शकता.

या गोष्टी लक्षात ठेवा :
– कोविन पोर्टलवर खुप वेळ जाऊ शकतो. सतत साईट रिफ्रेश करत रहा.
– केवळ परिसरात स्लॉट शोधू नका. जवळपासच्या परिसरात सुद्धा आपॅशन ठेवा.
– असे सेंटर निवडा जिथे गर्दी कमी असेल.
– अनेक यूजर्सचे म्हणणे आहे की, स्लॉट शोधण्याची सर्वा चांगली वेळ सायंकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत.
– व्हॅक्सीनेशन अपॉईंटमेंट ज्या दिवशी आहे, त्या दिवशी अर्धा-एक तास अगोदर पोहचा, जेणेकरून लांब रांग टाळता येईल.
– सोबत पाणी बॉटल, हँड सॅनिटायजर, वाईप्स, स्नॅक्स, एक पेन घेऊन जा.
– डबल मास्क आणि ग्लव्हज घाला. इतर लोकांपासून दूर रहा. कोणत्याही वस्तूला हात लावू नका. टेकून उभे राहू नका.
– ढीला आणि स्लीव्हलेस किंवा छोटे स्लीव्ह वाले शर्ट किंवा टी-शर्ट घाला, जे हातावर टाईट नसेल, ज्यामुळे इंजेक्शन सहज देता येईल.