तर ‘या’ खास कारणांमुळे दंडावर दिली जाते कोरोना व्हॅक्सीन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोविड -19 ची व्हॅक्सीन दंडावर का दिली जाते असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. पण ही पहिली अशी व्हॅक्सीन नाही जी दंडावर दिली जात आहे. बहुतांश व्हॅक्सीन मसल्समध्येच दिल्या जातात ज्यांना इंट्रामस्क्युलर इंजेक्शनद्वारे इंजेक्ट केल्या जातात. काही खास आजार जसे की मीजल्स, मम्प्स रुबेलाची व्हॅक्सीन त्वचेच्या खाली दिली जाते. मांसपेशीमध्ये इंजेक्शन देण्याचे कारण हे आहे की, ही व्हॅक्सीन एका डेल्टॉईड नावाच्या मांसपेशीत लागणे योग्य आहे, ज्या खांद्याच्या एक ट्राएंगल्स मसल्स असतात. परंतु याशिवाय ती मांडीच्या एंटेरोलेटरल मसल्सवर सुद्धा दिली जाते.

यामुळे व्हॅक्सीन जास्त प्रभावी होते का ?
मेडिकल एक्सपर्टनुसार, मांसपेशीत व्हॅक्सीन दिल्याचा फायदा हा होतो की, त्या प्रतिकारशक्ती रिस्पॉन्स उत्तेजित करण्याच्या व्हॅक्सीनच्या क्षमतेला प्रभावी बनवतात आणि सोबतच व्हॅक्सीन दिलेल्या ठिकाणी रिअ‍ॅक्शन होण्याची शक्यता कमी होते. तसेच कोविड व्हॅक्सीन काहीशी अशा पद्धतीने डिझाईन केली आहे की, ती दंडाच्या वरच्या मांसपेशीत दिली जावी.

व्हॅक्सीनची काम करण्याची पद्धत
व्हॅक्सीन व्यक्तीच्या दंडावर किंवा मांडीवर देताच ती सर्वप्रथम जवळच्या लिम्फ नोड (लसिकापर्व) मध्ये जाते.
यानंतर ती खास प्रकारच्या पेशींद्वारे घेतली जाते, ज्या टी आणि बी पेशांच्या व्हाईट ब्लड सेल्सला ट्रेन करण्याचे काम करतात.

काय होते या पेशींचे ?
या ट्रेनिंगमध्ये बॉडी सेल्स (पेशी) एकतर किलर सेल्स बनतात, ज्या कोरोना व्हायरस पीडित व्यक्तीच्या पेशींना शोधून मारता किंवा त्या अँटीबॉडी फ्लो करणार्‍या सेल्स बनतात. या संपूर्ण प्रोसेसमध्ये मांसपेशी महत्वाच्या आहेत, कारण त्यांच्यात खास प्रकारच्या महत्वाच्या प्रतिकारशक्ती पेशी असतात.