कच्ची हळद डायबिटीजच्या रूग्णांसाठी ‘अमृत’ समान, ‘या’ पध्दतीनं करा वापर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना काळात निरोगी राहाणे एक मोठे आव्हान आहे. यासाठी इम्यून सिस्टमवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ज्या लोकांची इम्यून सिस्टम कमजोर असते, त्यांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त असतो. इम्यून सिस्टम मजबूत करण्यासाठी काढ्याचे सेवन केले पाहिजे. डॉक्टर्स इम्यून सिस्टम मजबूत करण्यासाठी हळदीचे दूध पिण्याचा सल्ला देतात. डायबिटीजमध्ये कच्ची हळद रामबाण औषध आहे. जर तुम्ही सुद्धा डायबिटीजचे रूग्ण असाल तर यापासून आराम मिळवण्यासाठी, कच्च्या हळदीचे सेवन करा.

esearchgate.net वर प्रसिद्ध लेखानुसार, कच्ची हळद डायबिटीजमध्ये खुप लाभदायक असते. तिच्या सेवनाने डायबिटीजमध्ये लवकर आराम मिळतो. हळदीत करक्यूमिन आढळते, जे डायबिटीजला कंट्रोल करण्यासाठी उपयोगी ठरते. हे ग्लायसीमिया कमी करते. यासाठी डायबिटीजच्या रूग्णांनी रोज सकाळी नाश्त्याच्या वेळी कच्ची हळदयुक्त दूध प्यायले पाहिजे.

वजन कमी करण्यासाठी उपयोगी

तज्ज्ञ सुद्धा वजन कमी करण्यासाठी कच्ची हळद सेवन करण्याचा सल्ला देतात. ते म्हणतात की, करक्यूमिनमुळे एक्स्ट्रा फॅट बर्न होते. याच्या सेवनाने वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवता येऊ शकते. यासाठी कच्ची हळद वाटून दूधासोबत सेवन करू शकता.