Coronavirus : चष्मा घालणाऱ्या लोकांना ‘कोरोना’चा धोका कमी असतो का ? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना विषाणूचा देश आणि जगावर व्यापक परिणाम झाला आहे. लोकांची जीवनशैलीच बदलली आहे. या विषाणूला हरवण्यासाठी जगभरात अनेक संशोधने केली जात आहेत. या अनुक्रमे एका संशोधनात असे समोर आले आहे की, चष्मा घालणाऱ्या लोकांमध्ये कोविड-१९ संसर्ग होण्याचे प्रमाण कमी असू शकते, कारण विषाणू डोळ्यांच्या माध्यमातूनही शरीरात प्रवेश करतो. हे संशोधन चीनच्या सूइझोऊ प्रांतात केले गेले आहे. या संशोधनात कोविड-१९ च्या २७६ रुग्णांचा समावेश होता.

जामा नेत्रविज्ञान जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधन लेखातील संशोधकांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी या विषयाचा गांभीर्याने विचार केला आणि चष्म्याचा डोळ्यांसाठी कसा फायदा होतो किंवा डोळ्यांना कसे हतोत्साहित करतो अशी कल्पना करण्याचा प्रयत्न केला. या संशोधनात असे दिसून आले आहे की, सामान्य लोक अनवधानाने तासाला सुमारे १० वेळा त्यांच्या डोळ्यांना स्पर्श करतात. डोळे ही देवाची अनोखी भेटवस्तू आहेत, जे अत्यंत कोमल आणि नाजूक असतात. डोळ्यांमध्ये संरक्षणाचा अभाव असतो, ज्यामुळे कोविड-१९ चा धोका वाढतो.

या संशोधनात असे आढळले आहे की, SARS-CoV-2 रिसेप्टर एंजियोटेंसीन-कन्व्हर्टींग एन्झाइम २ डोळ्यांच्या पृष्ठभागावरही राहतो. याच्या माध्यमातून SARS-CoV-2 शरीरात प्रवेश करू शकतो. याव्यतिरिक्त SARS-CoV-2 अनुनासिकेद्वारे आणि अश्रूद्वारे देखील शरीरात पोहोचू शकतो. त्यामुळे श्वसन कोरोना संसर्ग होऊ शकतो.

सध्या उपलब्ध आकडेवारीनुसार, सुमारे १ ते १२ टक्के कोविड-१९ रुग्ण ऑक्युलर म्हणजे डोळ्यामुळे संक्रमित आहेत. कोरोना व्हायरस रुग्णांच्या तपासणीत कोविड-१९ अश्रूंमध्ये आढळला होता. याची पुष्टी नेत्र तज्ञांनी केली होती.

म्हणूनच डोळे कोरोना विषाणूचा संसर्ग आणि मानवी शरीरात प्रवेशाचीही महत्त्वपूर्ण केंद्रे असू शकतात. अशात चष्मा कोविड-१९ पासून संरक्षण करण्यास सक्षम आहे आणि कोरोना टाळण्यासाठी लोकांनी दररोज त्याचा वापर केला पाहिजे. यामुळे संसर्गाची शक्यता कमी होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like