आठवड्यातून 2 वेळा खा नट्स, कमी होईल हार्ट अटॅकचा धोका : स्टडी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   आठवड्यातून दोन वेळा ठराविक प्रमाणात नट्सचे सेवन तुमच्या हृदयाला मजबूत करते आणि हार्ट अटॅकचा धोका 17 टक्के कमी करते. इराणच्या इस्फहान कार्डियो व्हॅस्कुलर रिसर्चच्या एका शोधात ही बाब समोर आली आहे. ह्रदय रोगाची समस्या सध्या खुप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हार्ट अटॅकने मरणार्‍यांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. अशावेळी इराणच्या या संस्थेचा शोधातून निष्कर्ष काढण्यात आला आहे की, आठवड्यातून किमान एक किंवा दोनवेळा ठराविक प्रमाणात ड्रायफ्रूट्सचे सेवन केले तर हार्ट अटॅकचा धोका टाळता येतो.

काय आहे नट्समध्ये

प्रोटीन, मिनिरल्स, विटामिन, फायबर, फायटोस्टेरॉल आणि पॉलीफेनोल असते, जे हृदयासाठी उपयोगी आहे. गुड कॅलेस्ट्रॉल संतुलित होते. युरोपीय आणि अमेरिकी अभ्यासात सुद्धा अशाप्रकारचे संशोधन झाले आहे.

अनेक लोक कॅलरी आणि वजन वाढण्याच्या भितीने नट्स खात नाहीत. परंतु, अमेरिकेन संस्थेच्या अभ्यासानुसार अक्रोडमध्ये जेवढी कॅलरी सांगितली आहे, त्यापेक्षा 21 टक्के कमी कॅलरी यामध्ये आहे. जनरल ऑफ न्यूट्रीशिनमध्ये प्रकाशित या अभ्यासाचे प्रमुख डॉ. डेविड जे बेयर होते, जे युएसडीएममध्ये सिनियर सायंटिस्ट आहेत. या अभ्यासात आढळले की, एका अक्रोडमध्ये (28.35 ग्रॅम) 146 कॅलरी असते. हे संशोधन 35 वर्ष वयाच्या शहरी आणि ग्रामीण भागातील एकुण 5,432 प्रौढ लोकांवर करण्यात आले होते, ज्यामध्ये हे निष्कर्ष समोर आले.