Summer Food For Skin : यंग आणि हेल्दी त्वचेसाठी उन्हाळ्यात डाएटमध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पुनमेड सेंटरमध्ये प्रकाशित एक लेख ‘डाएट अँड स्किन एजिंग-फ्रॉम द पर्सपेक्टिव्ह ऑफ फूड न्युट्रिशन‘ मध्ये म्हटले आहे की, सामान्य पणे उच्च वसा असलेला आहार त्वचेचे वय वाढवण्याचे काम करतो, ज्यामुळे त्वचेत ऑक्सीडेटिव्ह तणाव, सूज निर्माण होते. काही अभ्यासांमध्ये दिसून आले आहे की, त्वचेवर वय वाढण्याच्या संकेतांचा थेट संबंध साखर आणि काही पदार्थ बनवण्याच्या पद्धतींशी (ग्रिलिंग, फ्राईंग, बेकिंग इत्यादी) आहे. यंग आणि हेल्दी त्वचेसाठी विशेषता उन्हाळ्यात कोणता आहार घ्यावा ते जाणून घेवूयात…

त्वचेसाठी उन्हाळ्यातील सुपरफूड्स
1. आंबा :
आंब्यात व्हिटॅमिन-सी उच्च मात्रेत असते, ज्यामुळे शरीरात कोलेजनचे उत्पादन वाढते.

2. टरबूज : हे फळ एंटीऑक्सीडेंट्स, व्हिटॅमिन-ए आणि सी युक्त असते. ज्यामुळे त्वचा ग्लो करते.

3. काकडी : काकडी स्किन केयर रुटीनचा महत्वाचा भाग आहे. त्वचेवर लावण्यासह तुम्ही काकडी डाएटमध्ये सुद्धा घ्या. फायबर आणि पाणीयुक्त काकडी खुप उपयुक्त आहे.

4. नारळपाणी : नारळ पाण्यात व्हिटॅमिन बी 2, बी 3 आणि सी भरपूर असते. जे त्वचेसाठी खुप लाभदायक आहे. त्वचा लवचिक होते आणि वाढत्या वयाचे बदल कमी होतात.

5. टोमॅटो : तरुण त्वचेसाठी आहारात टोमॅटोचा समावेश करा. टोमॅटोमध्ये उच्च स्तराचे व्हिटॅमिन सी असते. त्वचा निरोगी राहते.