Best Flour For Sugar Patients : मधुमेहाच्या रूग्णांसाठी ‘या’ 4 प्रकारच्या पीठाची भाकरी आहे बेस्ट डाएट

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मधुमेहाच्या रूग्णांना नेहमी डाएटमध्ये जास्त फाइबर आणि प्रोटीनचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे ग्लूकोजचा स्तर समान्य राहतो. जेव्हा आपण मधुमेहाच्या रूग्णाच्या डाएटबाबत बोलतो तेव्हा आपण सर्वप्रथम चपातीवर नजर टाकली पाहिजे. आपण सामान्यपणे गव्हाच्या पीठाच्या चपात्या खातो, जो मधुमेहाच्या रूग्णांसाठी चांगला डाएट नाही. मधुमेहाच्या रूग्णांना अशाप्रकारच्या पीठाचा वापर केला पाहिजे ज्यामुळे त्यांची शुगर कंट्रोल राहील. शुगर पेशंटसाठी कोणते पीठ बेस्ट आहे, ते जाणून घेवूयात.

नाचणी पीठ
नाचणी पीठात फायबर भरपूर असते, जो मधुमेहाच्या रूग्णांसाठी खुप चांगला पर्याय आहे. फायबरमुळे पोट खुपवेळ भरल्यासारखे वाटते. तसेच वजन नियंत्रणात राहते. फायबर पचण्यासाठी लागणारा मोठा कालावधी ब्लड शुगरला हळुहळु कमी करण्याचे कारण बनतो.

राजगिरा पीठ
आपल्या अँटी-डायबिटिक आणि अँटीऑक्सीडेंट गुणांमुळे राजगिरा पीठ लोकप्रिय आहे. हा आटा तुमच्या रक्तातील शुगरचा स्तर नियंत्रित ठेवतो. खनिज, व्हिटॅमिन, प्रोटीन आणि लिपिडने युक्त हे पीठ शुगरच्या रूग्णांसाठी लाभदायक आहे.

बार्ली पीठ
बार्लीचे पीठ आतड्यातील हार्मोन आणि मेटाबॉलिज्म वाढवण्यात मदत करते. शरीर निरोगी ठेवते आणि विविध आजारापासून दूर राहण्यास मदत करते.

चना पीठ
चनापीठमध्ये विरघळणारे फायबर भरपूर असते. जे कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यात मदत करते. यामुळे ब्लड शुगर नियंत्रणार राहते.