Mosquito Borne Diseases : डास चावल्यानं होतात ‘हे’ 4 जीवघेणे आजार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारतातील वातावरण डास आणि त्यांच्या प्रजननासाठी अनुकूल असल्याचं मानलं जातं. त्यामुळे प्राचीन काळात सुद्धा डासांपासून सुटका मिळण्यासाठी वेळोवेळी अनेक राजांनी वेगवेगळ्या उपाययोजना आखल्याची माहिती आहे. इतकंच नाही तर अनेक पुराण ग्रंथांमध्ये देखील डासांचा आणि त्यांच्यापासून होणाऱ्या आजारांवरील उपचारांचा उल्लेख आहे. पावसाळ्यात डासांच्या संख्येत मोठी वाढ होते. त्यामुळं आज आम्ही तुम्हाला डासांपासून पसरणाऱ्या अजारांसंबंधी माहिती सांगणार आहोत.

नगर निगमचे आरोग्य अधिकारी डॉ. अखिलेश उपाध्याय यांनी सांगितले की, डास चावल्यामुळे अनेक प्रकारचे बॅक्टेरिया, व्हायरस आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि आपली रोग प्रतिकारक क्षमता कमी करतात. त्यानंतर अनेक रोग शरीरात पसरण्याचा धोका असतो.

या रोगांमध्ये अनेक प्रकारचे रोग आहेत पण मुख्यतः मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, झिका ताप, पिवळा ताप, वेस्ट नाईल व्हायरस असे आजार असतात. या तर जाणून घेऊ या आजारांबद्दल.

1. मलेरिया – मलेरिया एका विशिष्ट व्हायरसमुळे होतो, ज्याचं नाव प्लेसमोडियम असं आहे. याचा प्रसार इंफ्लिलीज डासांच्या मादी मार्फत होतो. या संक्रमित डासाच्या चावण्याने व्हायरस शरीरात प्रवेश करतात आणि या मलेरिया आजाराची लागत होते. मलेरिया मुळे लिव्हरला धोका निर्माण होतो. मलेरियाचे लक्षणं मुख्यतः ताप, थंडी, डोकेदुखी, उल्टी, घाम येणे असे असतात.

2. डेंग्यू – डास चावल्याने होणाऱ्या अजारांपैकी सर्वात घातक आजार म्हणजे डेंग्यू. याच्या व्हायरसचे नाव देखील डेंग्यूच आहे. डेंग्यूचा प्रसार एडिस नावाच्या डासाच्या मादीमार्फत होतो. या आजाराचे मुख्य लक्षणं ताप, थंडी, डोकेदुखी, शरीरावर चट्टे दिसणे, अंगदुखी यांसारखी असतात. यावर आत्तापर्यंत होतीही लस बनवण्यात अली नाही.

3. चिकणगुनिया – चिकणगुनिया देखील एडिस नावाच्या डासाची मादी चावल्याने होतो. चिकणगुनियाची साधारण लक्षणं डोकेदुखी, उलटी, अंगदुखी आणि त्वचेवर चट्टे पडणे अशी असतात. चिकणगुनियाची लक्षणं 5 ते 7 दिवसांत दिसून येतात. हा आजार प्रतिकार क्षमता खूप कमी करतो.

4. झिका ताप – झिका तापाच्या व्हायरसचं नाव देखील झिका व्हायरस असंच आहे. हा व्हायरस डासांमार्फत शरीरात पसरतो. झिका तापात त्वचेवर चट्टे येणे, डोकेदुखी, त्वचेवर खाज आणि अंगदुखी असे लक्षणं दिसून येतात.