Stay Home Stay Empowered : कोरोना काळात शरीरासह मनाला सुद्धा हवा या 7 प्रकारचा पौष्टिक आहार

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत आपल्या शरीरासह मानसिकदृष्ट्या सुद्धा निरोगी राहणे आवश्यक आहे. आपण शारीरीकदृृष्ट्या निरोगी राहण्यासाठी व्यायाम आणि चांगला आहार घेतो. परंतु मानसिक आरोग्यासाठी कोणता आहार घ्यावा हे न्यूट्रिशनल सायकॅट्रीमध्ये प्रकाशित संशोधनानुसार जाणून घेवूयात.

1. मासे
मासे हे ब्रेन फूड म्हणून ओळखले जाते कारण यामध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड असते. यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते.

2. बेरी
स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि ब्लॅकबेरी. हा एक चांगला नाश्ता आहे. यामध्ये अँटी ऑक्सीडेंट असते. एंजायटी-डिप्रेशन मध्ये दिलासा मिळतो.

3. दही
संशोधनानुसार पोट-मेंदू यांचा जवळचा संबंध असतो. यामुळे दह्यातील महत्वाचे घटक तणाव, बेचैनीचा स्तर कमी करतात.

4. होलग्रेन किंवा कडधान्य
कडधान्य ट्राफ्टोफान नावाच्या अ‍ॅमिनो अ‍ॅसिडचा मोठा स्त्रात आहे. यामुळे फील गुड हार्मोन सेरोटोनिनचे उत्पादन वाढते. डोकं शांत राहते, मूड चांगला राहतो, झोप चांगली येते.

5. आक्रोड
मानसिक आरोग्यासाठी आक्रोडचे सेवन करा. हे अँटीऑक्सीडेंटचे भांडार आहे. मेंदूत नवीन पेशींची निर्मिती होते.

6. हिरव्या पालेभाज्या
हिरव्या पालेभाज्या सेवन केल्याने मानसिक आरोग्य चांगले राहते. सायन्स जर्नल न्यूरोलॉजीत प्रकाशित लेखानुसार पालक आणि इतर भाज्या मानसिक आरोग्यासाठी लाभदायक असतात.

7. बीन्स
बीन्स आनंदी मेंदूचा आहार आहे. यात भरपूर फायबर आणि अँटीऑक्सीडेंट असते यामुळे ब्लड शुगर स्थिर राहते. जास्त उर्जा तयार होते. मानसिक आरेाग्य चांगले राहते. बीन्समध्ये थायमिन व्हिटॅमिन असते जे स्मरणशक्तीसाठी चांगले बनवते.