त्वचेवर दिसणारे हे 6 बदल ‘मधुमेहा’ची लक्षणे सुद्धा असू शकतात, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – आधुनिक काळात डायबिटीज एक सामान्य समस्या झाली आहे. या आजारात आहार आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. नियमित औषध घेणे, दिनचर्या आणि आहारात सुधारणा करून डायबिटिज नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. या आजारात त्वचेसह शरीराचे अनेक भाग प्रभावित होतात. जेव्हा डायबिटीज त्वचेला प्रभावित करतो, तेव्हा त्वचेसंबंधी अनेक समस्या होतात. जर तुम्हाला माहित नसेल तर जाणून घ्या…

1 नेक्रोबायोसिस लाइपॉइडची लक्षणे
या स्थितीत त्वचेवर मुरूमांच्या आकाराचे दाणे येऊ लागतात. हे दाणे पॅचेस म्हणजे चटट्यांमध्ये बदलतात. सोबतच पॅचेसची त्वचा कडक होते आणि सूज येते. या पॅचेसचा रंग पिवळा, तपकिरी किंवा लाल असतो. यादरम्यान, पॅचेसमध्ये खाज सुद्धा सुटते. अनेक प्रकरणात वेदनांची तक्रार सुद्धा होते. जर तुमच्या त्वचेवर असे डाग किंवा चट्टे दिसत असतील तर ब्लड शुगरची तपासणी करा.

2 अकन्थोसिस निगरिकन्सची लक्षणे
जर तुमची मान, दंड आणि ग्रॉइन म्हणजे पोट आणि मांड्यांच्या मधे गडद डाग दिसत असतील, तर हे प्री-डायबिटीजचे संकेत आहेत. यास बॉर्डरलाइन डायबिटीज सुद्धा म्हणतात. या स्थितीत व्यक्तीच्या रक्तात इन्सुलिनचा स्तर खुप वाढतो. वैद्यकीय भाषेत यास अकन्थोसिस निगरिकन्स म्हटले जाते.

3 फोड किंवा जखम
काही प्रकरणात डायबीटीजच्या रूग्णांमध्ये फोडांचे लक्षण सुद्धा आढळते. या स्थितीत हात, पाय, दंड, मनगटावर मोठे फोड येतात. मात्र, यांच्यामुळे वेदना होत नाहीत.

4 अ‍ॅनथेस्मा
रक्तात वसा स्तर वाढल्याने डोळ्यांच्या जवळपास पिवळ्या रंगाचे पॅच येऊ लागतात. हे सुद्धा डायबिटीजचे संकेत आहेत. यास अ‍ॅनथेस्मा म्हणतात.

5 कोरडी त्वचा
जर तुम्ही डायबिटिजने पीडित असाल, ती ही सामान्य समस्या आहे. अशा स्थितीत त्वचा कोरडी पडते आणि खाज सुटते. शरीरात खराब रक्ताच्या संचारामुळे त्वचेला खाज सुटते. जर औषध आणि लोशन लावून सुद्धा ठिक होत नसेल, तर डॉक्टरांकडे जा.

6 जखम
जर जखम भरून येण्यास मोठा कालावधी लागत असेल, तर हा सुद्धा डायबिटीजचा संकेत आहे.