Signs Of Leukemia : ‘ही’ 7 लक्षणं आहेत ‘ब्लड कॅन्सर’ची, वेळीच ओळखलं तर ‘उपचार’ होतील ‘सोपे’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जेव्हा आपण कर्करोगाचे नाव ऐकतो तेव्हा आपल्याला त्वचेचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि प्राणघातक स्वादुपिंडाचा कर्करोग याची कल्पना येते. ल्युकेमिया हा देखील कर्करोगाचा एक प्रकार आहे, जो कर्करोगाच्या अनेक प्रकारांपेक्षा जास्त प्राणघातक आहे. हा प्रकार रक्ताचा कर्करोग म्हणून जास्त प्रमाणात ओळखला जातो. इतर कर्करोगांप्रमाणेच हा कर्करोग कसा होतो याबद्दल कोणतीही निश्चित माहिती नाही. ल्युकेमिया बोन मॅरो म्हणजेच अस्थिमज्जामध्ये सुरू होतो, जो पांढर्‍या रक्त पेशींच्या असामान्य होण्यामुळे होतो.

ल्यूकेमियाचे बायोप्सीद्वारे निदान होते. त्यानंतर त्यावर केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीद्वारे उपचार केले जातात. रूग्णांमध्ये बॉन मॅरो ट्रान्सप्लांट देखील केले जाते. हे जाणून तुम्हाला आनंद होईल की गेल्या 5 वर्षात 57% लोक रक्ताच्या कर्करोगातुन बचावले गेले आहेत. यामुळे लोकांमध्ये अशी आशा निर्माण झाली आहे की ल्यूकेमियावर आता उपचार केले जाऊ शकतात. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला ल्यूकेमिया आजाराची लक्षणे सांगत आहोत, हे जाणून आपण या प्राणघातक रोगापासून वाचू शकता-

त्वचेवर लहान ठिपके असणे
हे लहान ठिपके petechiae म्हणून ओळखले जातात, ते लाल रंगाचे असून हातावर, पाठीवर , छातीवर तसेच चेहऱ्यावर असतात. ल्यूकेमियामुळे, प्लेटलेट बर्‍याच वेगाने कमी होण्यास सुरवात होते. दुसरीकडे, प्लेटलेटच्या कमतरतेमुळे, शरीरात petechiae होणे सुरू होते, ज्यास आपण बर्‍याचदा ओळखण्यास चुकतो.

सांधे दुखी
हे ल्यूकेमियाचे सर्वात सामान्य लक्षण आहे, ज्याकडे बर्‍याचदा दुर्लक्ष केले जाते. यात सांध्यामध्ये वेदना होते, कधीकधी हळूहळू वेदना होतात. या वेदनाचे मुख्य कारण असामान्य White Blood Cells आहेत. यामुळे पाय आणि हातांमध्ये ही वेदना अधिक होतात. हे देखील ल्यूकेमिया लक्षणे आहेत.

डोकेदुखी
हे एक सामान्य लक्षण आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष करणे प्राणघातक होते. जर आपल्याला बराच काळ डोकेदुखीचा त्रास असेल तर ही ल्युकेमियाची लक्षणे देखील असू शकतात. जेव्हा ल्यूकेमिया होतो तेव्हा चेहरा पिवळसर होतो.

सूज येणे
जेव्हा ल्यूकेमिया होतो तेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत होते ज्यामुळे ग्लॅण्डस आणि लिम्फ नोड्स सूजतात . यामध्ये मान, ओटीपोट, हाताच्या खाली किंवा जननेंद्रियावर एक ग्रंथी वाढते, ज्याचा रंग निळा किंवा जांभळा असतो.

थकवा
ल्यूकेमियाचा आजार असलेला माणूस खूप लवकर थकतो. अशी व्यक्ती कोणतीही कामे करण्यास असमर्थ असते. शरीरात रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही, शरीरात किरकोळ दुखापत झाली तरीही दुखापतीच्या जागेवर सूज किंवा काळा डाग येतो . यामुळे रक्तस्त्राव होण्याचा धोका देखील वाढतो.

ताप आणि संसर्ग
ल्युकेमियामुळे शरीराचे तापमानदेखील असामान्य होते, ज्यामुळे ताप आणि संसर्गाचा धोकाही वाढतो. ताप देखील शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करते, ज्यामुळे आणखी बरेच रोग होतात. असामान्य मार्गाने वजन कमी होऊ लागते. जेव्हा ल्युकेमिया होतो तेव्हा उलट्यांचा धोका देखील वाढतो.

श्वास घ्यायला अडथळे निर्माण होणे
ल्युकेमियामुळे रक्ताभिसरण होण्यास अडथळा ठरतो ज्यामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता उद्भवते आणि नंतर श्वासोच्छवासामध्ये त्रास होतो. ल्युकेमिया ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये गुदमरल्यासारखे होणे अशी समस्या असते. पोटात सूज येणे आणि वेदना होते. ज्यात स्पलीन आणि लिवर वर सूज येते या सूजेमुळे पोटात वेदना होतात. तसेच, पोट नेहमीच भरल्यासारखे वाटते .