जर तुम्हाला डायबिटीज आहे तर ‘या’ 4 पद्धतीनं जखमेची काळजी घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – जर एखाद्या व्यक्तीला डायबिटीज असेल, तर जखम बरी होण्यास खुप वेळ लागतो. प्रत्यक्षात रक्त शर्करेचा स्तर जेवढा जास्त असेल, जखम बरी करण्यास तेवढाच जास्त वेळ लागतो. काही वेळा तर अवयव कापण्याची वेळ सुद्धा येते. परंतु, चांगली गोष्ट ही आहे की, योग्य काळजी घेतल्यास हा धोका टाळता येऊ शकतो. यासाठी जखमेची काळजी कशी घ्यावी ते जाणून घेवूयात…

1 जखमेची नियमित तपासणी
कोणतीही जखम असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करा. नियमित आपले पाय तपासा. पायांच्या खाली पहाण्यासाठी आरशाचा वापर करा.

2 ड्रेसिंगकडे दुर्लक्ष नको
ड्रेसिंग योग्य कालावधीनंतर बदलत राहा. डॉक्टरांकडून याची माहिती करून घ्या.

3 ब्लड शुगरचा स्तर
ब्लड शुगरचा स्तर नियंत्रित ठेवला तर जखम लवकर भरून येण्यास मदत होईल. यासाठी योग्य आहार घ्या. नियमित औषधे घ्या.

4 नियमित व्यायाम करा
नियमित व्यायाम केल्याने ब्लड सर्क्युलेशन सुधारते. पयात रक्त प्रवाह सुधारतो आणि सन्न होण्याची समस्या दूर होते. यासाठी जिमला जा, योगा करा किंवा चालायला जा. तत्पूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.