सावधान ! एकच मास्क सतत वापरताय? होऊ शकतो जीवघेण्या काळ्या बुरशीचा धोका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग या बाबींवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्यात मास्क वापरणे जगभरातील अनेक देशांत बंधनकारक करण्यात आले आहे. भारतातही मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आले आहे. पण तुम्ही मास्क वापरताना विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

कोरोनाबाधित रुग्णांच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्यास ब्लॅक फंगसची लागण होऊ शकते. विशेषत: जे लोक ओला मास्क वापरतात त्यांच्यामध्ये ही बुरशी वाढण्याचे प्रमाण अधिक आहे. कोरोना आणि ब्लॅक फंगस यांचा हल्ला झाल्यास रुग्णाला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. कोरोनाबाधित रुग्णाने स्वच्छ आणि वाळलेला मास्क वापरणे गरजेचे आहे. मास्क धुतल्यानंतर तो उन्हात वाळवावा. ज्यामुळे त्यातील बॅक्टेरिया मरेल. तुमचा आजुबाजूचा परिसरही स्वच्छ ठेवा.

तसेच कोरोना रुग्णाला ब्लॅक फंगस इन्फेक्शन झाले असेल तर कोरोनासोबत त्यासाठीही उपचार घ्यावे लागतात. पेशंटसाठी अँटीबायोटीकची मात्रा वाढवावी लागते. एक महिना अँटीफंगल औषधे घ्यावी लागतात. तसेच कोरोनाबाधित रुग्णाला स्टेरॉईड दिले जात असेल तर अशावेळी जास्त काळजी घ्यायला हवी. स्टेरॉईड घेणाऱ्या पेशंटमध्ये ब्लॅक फंगस वाढण्याची शक्यता जास्त आहे.