Healthy Foods : जे 6 पदार्थ खाण्यास तुम्ही घाबरता, ते असे ठरू शकतात लाभदायक

पोलीसनामा ऑनलाईन – खाण्या-पिण्याच्या आरोग्यदायी पदार्थांबाबत तर सर्वजण जाणतात, परंतु खुप कमी लोकांना माहिती असते की, काही अनहेल्दी पदार्थ सुद्धा शरीराला लाभ पोहचवू शकतात. पण हे त्यावर अवलंबून आहे की तुम्ही ते कसे बनवता. याबाबत जाणून घेवूयात.

1 पास्ता –
पास्तामध्ये फॅट आणि मीठ कमी असते. पोट खुप वेळ भरल्यासारखे वाटते, यामुळे ओव्हरइटिंग होत नाही. यामध्ये अनेक पदार्थ टाकू नयेत. अनेक सॉस टाकणे टाळावे. यामध्ये ऑलिव्ह ऑईलमध्ये पनीर टाकून बनवा.

2 चॉकलेट –
चॉकलेटमधील फ्लेवोनोइड्स सेल डॅमेजपासून वाचवते. ब्लड प्रेशर कमी करण्यासह मेंदू आणि हृदयाचे अनेक आजार दूर ठेवते. हे कमी प्रमाणात खाऊ शकता.

3 पॉपकॉर्न –
अनेक लोकांना वाटते की पॉपकॉर्न जंक फूड आहे. पण तसे नाही. पॉपकॉर्न फायबरयुक्त असल्याने एनर्जी देते. यात व्हिटॅमिन इ, मँगेनीज, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडेंट असते जे आजार आणि सेल डॅमेजपासून वाचवते. पण मीठ आणि बटर कमी टाका.

4 पोटॅटो सॅलेड –
उकडलेल्या बटाट्यात न विरघळणारे स्टार्च असते, जे फायबरप्रमाणे काम करते. यामुळे पोट चांगले राहाते. यातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसह अनेक पोषकतत्व असतात. कम फॅटसाठी यामध्ये कमी कॅलरीवाले मेयोनीज टाकून खा.

5 रेड मीट –
सामान्यपणे रेड मीट आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. परंतु हे या गोष्टीवर अवलंबून आहे की तुम्ही कोणत्या प्रकारचे मीट खाता. कमी फॅटवाले रेड मीट खा. यामध्ये प्रोटीन, ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड, व्हिटॅमिन बी12, झिंक आणि आयर्न आढळते. हे कमी प्रमाणात खाऊ शकता.

6 कॉफी
स्टडीनुसार कॉफी प्यायल्याने स्ट्रोकचा धोका कमी होतो. मात्र, जास्त कॉफी प्यायल्याने पोट खराब सुद्धा होऊ शकते. यामध्ये साखर आणि क्रीम कमी प्रमाणात असावे.

You might also like