सॅनिटायजरमधील ‘हे’ धोकादायक रसायन करतं तुमच्या आरोग्याचं मोठं नुकसान, जाणून घ्या

कोविड-19 ची पहिली केस समोर आली, त्यास 6 महिने पूर्ण झाले आणि जगभरातील तज्ज्ञ आजही या धोकादायक आजारावर मात करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. या संसर्गापासून वाचण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग असे उपाय केले जात आहेत. दरम्यान, यातील सॅनिटायझरच्या अति वापराने नुकसान होत असल्याचे समोर आले आहे. हे नुकसान कशाप्रकारचे आहे ते जाणून घेवूयात…

सॅनिटायझरचा भयंकर वापर
एक आरोग्य संघटनेनुसार, हँड सॅनिटायझर प्यायल्याने तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. एक व्यक्ती कायमसाठी आंधळा झाला आहे. हेल्थ एक्सपर्टनुसार, हे तीन लोक मिथेनॉलमुळे मारले गेले आहेत. तर 3 लोक मृत्यूशी लढा देत आहेत.

अति सॅनिटायझरच्या वापराचे धोके

1 मळमळ, उलटी, चक्कर येणे, अस्वस्थ वाटणे, भ्रम, अस्पष्ट दृष्टी, तात्पुरता अंधळेपणा, कोमा असे जीवघेणे त्रास होऊ शकतात.

2 शरीराच्या तंत्राचे खुप मोठे नुकसान होते. एखाद्याचा जीवसुद्धा जाऊ शकतो.

3 त्वचेतून देखील हे विषारी रसायन शोषले जाऊ शकते. यासाठी हॅड सॅनिटायझरमधील घटक जाणून घ्या.

हे लक्षात ठेवा

* कमीत कमी 20 सेकंद हात साबणाने धुवा.
* पाण्याने हात धुणे कोणत्याही सॅनिटायझरच्या तुलनेत चांगले आहे.
* जेव्हा हात धुण्यासाठी पाणी, साबण उपलब्ध नसेल तेव्हाच सॅनिटायझर वापरा.
* तुमच्या सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलची मात्रा 60 टक्के असावी.