थंडीच्या दिवसांमध्ये संत्र खाण्याचे ‘हे’ 6 ‘गुणकारी’ फायदे, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – थंडीच्या दिवसात संत्र्याचा हंगाम असल्यामुळे बाजारपेठेत संत्री मोठ्या प्रमाणात दिसतात. संत्री हे फळ सगळ्यांनाच आवडते. हे फळ खाल्ल्याने शरीराला अनेक गोष्टीचा फायदा होतो. थंडीत नियमितपणे संत्री खाणे तुम्हाला निरोगी ठेवू शकते. त्यामुळे तुमच्या त्वचेवर आद्रता आणि ओलावा राहतो. संत्रीमध्ये मोठ्याप्रमाणात फायबर असते. त्यामुळे तुमची पचनक्रिया सुरळीत राहते. तुमचे वजन आणि रक्तातल्या साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी फायबरचा चांगला उपयोग होतो.

संत्री खाण्याचे आणखी फायदे पुढीलप्रमाणे…

 

1. संत्री खाल्यामुळे तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास कमी होतो.

2. आपले हात आणि शरीरातील हाडे बळकट करण्यासाठी संत्रीमधील कॅल्शिअम मदत करते. त्यामुळे त्याचा वापर च्युईंगममध्ये केला जातो.

3. संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनची शक्यता कमी होते. तसेच कॅन्सर आणि ह्रदयरोगाला लांब ठेवते.

4. संत्र्याचा सुवास हा खूप चांगला असल्यामुळे त्याचा वापर अत्तरांमध्येही केला जातो.

5. संत्र्यातील सगळ्या गुणधर्मांमुळे अनेक औषधं आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये संत्री वापरली जातात.

6. ज्यांना आंबट पदार्थ खायला आवडतात त्यांनी संत्री खाणे सुरु केले पाहिजे. यामुळे तुमच्या शरीराला नक्कीच फायदा होईल.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/

You might also like