तरूणांना देखील होऊ शकतो सांधेदुखीचा त्रास, निरोगी राहण्यासाठी तज्ज्ञांनी दिल्या ‘या’ खास टिप्स, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन- सांधेदुखीच्या ( Bone pain) सामान्य समस्येचं गंभीर आजारातही रूपांतर होऊ शकतं. पुरूषांच्या तुलनेत सर्वाधिक महिलांना या समस्येचा सामना करावा लागतो. सांधेदुखीची अनेक कारणे आहेत. लठ्ठपणा, ब्लड कॅन्सर अशा समस्या वाढत्या वयात उद्भवतात. बोन फ्लूइड किंवा बोन मेंम्ब्रेनमध्ये परिवर्तन झाल्यामुळे समस्या उद्भवत असतात.

ओन्ली माय हेल्थशी बोलताना ऑर्थोपेडिक डॉ. अखिलेश यादव यांनी याबाबत माहिती दिली आहे. निरोगी हाडांसाठी (expert-tips-stay-healthy) कॅल्शियम, व्हिटामीन डी या शिवाय प्रोटीन, विटामिन के, मॅग्नीशियम, पोटेशियम, व्हिटामिन सी आदीची गरज असते. सध्या लॉकडाऊनमुळे लोक अनेक दिवस आपापल्या घरात बंद होते, परिणामी व्हिटामीन्सच्या अभावामुळे अनेकांना सांधेदुखीचा त्रास उद्भवण्याची शक्यता आहे.

दिवसाला व्यक्तीला 1000 ते 1200 मिलीग्राम कॅल्शियमची गरज असते. हिरव्या ताज्या भाज्या कॅल्शियमचे चांगले स्त्रोत आहेत. व्हिटामीन डी ची कमतरता असल्यास हाडं कमकुवत होतात. सुर्यप्रकाश व्हिटामीन डीचे सगळ्यात मह्त्वाचे स्त्रोत आहे. पण जे लोक नेहमीच घरात बंद असतात त्यांना व्हिटामीन डी पुरेश्या प्रमाणात मिळत नाही. परिणामी आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. व्हिटामीन्सची कमतरता भरून काढण्यासाठी अंडी, दूध, फळे आदी आहारात घ्यावेत. तसेच व्यायाम स्नायूच्या बळकटीकरणासाठी अतिशय उपयुक्त असतो. पण ह़ाडामधील कॅल्शिअमचं प्रमाण वाढवून त्यांच्या मजबुतीकरणासाठीसुद्धा अतिशय उपयुक्त ठरतो. म्हणून रोज घरच्या घरी 20 ते 30 मिनिटे वेळ काढून व्यायाम करणे गरजेचे आहे.

ही पदार्थ आहात घ्या
1) अंजीर : अंजीरमध्ये कॅल्‍शियम बरोबर फायबर, पोटेशियमची मात्रा आढळते. यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. पाचन क्रिया आणि मासपेशींना सुदृढ ठेवणे आणि त्याचसोबत हृदयरोग व मधुमेहासाठी गुणकारक ठरते. डॉक्टर्स सुद्धा रोज अंजीर खाण्याचा सल्ला देतात. त्यातील तंतू शरीराच्या विकासासाठी लाभदायक ठरतात.

2) पनीर : पनीरमध्ये कॅल्शियमबरोबरच प्रोटीनसुध्दा असते. आहारात पनीरचा समावेश केल्यास कॅल्शियमचे प्रमाण योग्य राहते. त्यामुळे हाड बळकट होतात. त्याशिवाय केस गळणंसुध्दा पनीरचं सेवन केल्याने थांबते.

3) संत्री : प्रत्‍येकाने आहारात फळांचा समावेश करायला हवा. यामध्‍ये प्रामुख्‍याने संत्री या फळाचा वापर करावा. संत्री या फळामध्‍ये डी जीवनसत्‍व व कॅल्‍शियम हा घटक आढळतो. सध्या हिवाळा सुरू झाल्याने संत्री मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध आहेत.

4) बदाम : बदाम हा कॅल्‍शियमचा चांगला स्‍त्रोत आहे. बदामात सर्व घटकापेक्षा जास्‍त कॅल्‍शियम आढळते. कॅल्‍शियम आणि प्रोटीनचे प्रमाण जास्‍त असते. बादामाचे सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढते.

5) दुग्धजन्य पदार्थ – दुधयुक्‍त पदार्थात कॅल्‍शियमचे प्रमाण आढळते. दूध, पनीर, दही यांचा आहारात समावेश करायला हवा. यामुळे शरिरात कॅल्‍शियमची वाढ होण्‍यास मदत होईल.