Health Tips : आजारांपासून राहायचे असेल दूर तर रोज पायी चाला, जाणून घ्या याचे 7 फायदे

नवी दिल्ली : वृत्त संस्था – जगभरात वॉकिंगला बेस्ट वर्कआउटच्या कॅटेगरीत ठेवले जाते. यासाठी रोज किमान 20 मिनिटे चालले पाहिजे. स्वताला फिट ठेवण्याची ही खुप सोपी आणि प्रभावी पद्धत आहे. जेव्हा इच्छा असेल आणि वेळ मिळेल तेव्हा हा व्यायाम करू शकता. यामुळे अनेक आजार दूर राहतील. पायी चालण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात…

1.हार्ट मजबूत होते
हेल्थलाईननुसार रोज अर्धातास वॉक केल्याने कोरोनरी हार्ट डिसीजचा धोका 19 टक्केपर्यंत कमी होतो. जास्तवेळ आणि वेगाने वॉक आणखी लाभ देते.

2.ब्लड शुगर राहील नियंत्रित
वॉकमुळे ब्लड शुगर नियंत्रित राहते. रोज जेवणानंतर 15 मिनिटांचा वॉक ब्लड शुगर कमी ठेवू शकतो.

3.सांधेदुखी होईल कमी
हिप आणि गुडघ्यांच्या हाडांमध्ये वेदना असतील तर रोज वॉक करा. यामुळे मसल्स मजबूत होतील, लूब्रीकेट तयार होईल.

4.इम्यूनिटी होईल बूस्ट
इम्यूनिटी वाढवण्यासाठी वॉक केला पाहिजे. संशोधनानुसार, रोज 30 ते 45 मिनिटे वॉक करणारे 45 टक्के कमी आजारी पडतात.

5.मेंदूसाठी चांगले
आठवड्यात 2 तास जरी वॉक केला तरी त्यांचे ब्रेन टिश्यू चांगल्या प्रकारे काम करतात. यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका 30 टक्के कमी होतो.

6.वजन नियंत्रणात राहते
रोज 30 मिनिटे पायी चालल्याने 50 टक्के लठ्ठपणाचा दर कमी होतो. मसल्स स्ट्राँग होतात. कोणतेही काम आळसाशिवाय करू शकता.

7.मूड चांगला राहतो
संशोधनात आढळले आहे की, जर रोज 30 मिनिटे वॉक केला तर मूड चांगला राहतो. तसेच तणाव, भीती, डिप्रेशन, नकारात्मक भावना दूर होतात आणि एनर्जी राहते. मेंटल हेल्थ चांगली राहते.