Health Tips : रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे होतात ‘हे’ 9 जबरदस्त फायदे, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – दररोज सकाळी लिंबू पाण्याचे सेवन केल्याने वजन कमी करण्यासह शरीराचे अनेक रोगांपासून रक्षण होते. यामुळे पचनक्रिया हेल्दी राहाते आणि पोटाच्या अनेक समस्या दूर राहतात. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि बी, कॅल्शियम, मॅग्नीशियम, कार्बोहायड्रेट सारखे भरपूर औषधी गूण असतात. ज्यामुळे अपचन, पोटाच्या समस्या, डायबिटीज आणि लीव्हरसारख्या समस्या दूर राहतात. लिंबू पाण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात…

1 उत्साह, ताजेपणा
ताजेपणा जाणवतो. दिवभर उत्साह कायम राहतो.

2 इम्यूनिटी
यातील बॉयोफ्लेवोनॉयड, व्हिटॅमिन सी आणि फायटोन्यूट्रियंट्समुळे इम्युनिटी बूस्ट होते. एनर्जी वाढते.

3 वजन कमी होते
शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. लीव्हरचे आरोग्य सुधारते.

4 हेल्दी त्वचा
चेहर्‍यावरील सुरकुत्या, ब्लॅकहेड आणि पिंपल्सचे डाग गायब होतात. त्वचेच्या पेशी सुरक्षित करणे, डाग हलके आणि त्वचेचे अल्ट्राव्हॉयलेट किरणांपासून रक्षण करण्यास मदत करते.

Advt.

5 पचनक्रिया
यातील हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिडमुळे पचनक्रिया सक्रीय होते. अ‍ॅसिडिटी, जळजळ आणि गॅस आदी समस्या दूर होतात.

6 संसर्गापासून संरक्षण
लिंबूत अँटीऑक्सीडेंट आणि व्हिटॅमिन सी भरपूर असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामुळे रोगांच्या संसर्गापासून संरक्षण होते.

7 किटनी स्टोन
किडनी स्टोनचा धोका दूर होतो. शरीर हायड्रेट राहते.

8 डायबिटीज
डायबिटीजच्या रूग्णांसाठी हे गुणकारी आहे. शुगर लेव्हल नियंत्रित ठेवते.

9 ब्लड प्रेशर
ब्लड प्रेशर तसेच तणाव कमी होतो. हाय ब्लड प्रेशर, चक्कर येणे आणि मळमळ यावर खुप उपयोगी आहे.