रिसर्च : वजन कमी करण्यासाठी कधी आणि किती चालायचं ते जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – चालणं (walking) किंवा फिरणं शरीरासाठी, आरोग्यासाठी नेहमी फायदेशीर ठरत. वजन कमी (weight loss) करण्यासाठी आजारांपासून दूर राहण्यासाठी चालणं नेहमी फायदेशीर ठरतं. जे लोक व्यायाम (exercise) करत नाहीत, जिमला (gym) जात नाहीत. असा लोकांसाठी हेल्दी राहण्यासाठी नियमित चालायला पाहिजे. अन्यथा जसजसं वय वाढत जातं तसतसे आजार उद्भवतात. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्च (reserch) नुसार जेवण केल्यानंतर चालल्याने अनेक फायदे होतात. वजन कमी करण्यासाठी तसेच शरीरात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी चालणे अत्यंत गरजेचं आहे.

चालण्याची योग्य वेळ कोणती ?
दिवसभरात कोणत्याही वेळी चालल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. पण वजन कमी होण्यासाठी तसेच रक्तदाब, डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी चालणं हा सगळ्यात सोपा व्यायाम आहे. ज्या तरुणांना आता कोणताही आजार नाही त्यांनी भविष्यातील आरोग्य विषयक गोष्टी लक्षात घेता चालण्याची सवय ठेवली पाहिजे.

रोज व्यायाम केल्याने वजनासह शरीरातील साखरेचं प्रमाणही नियंत्रणात राहतं. 2016 मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार जेवणानंतर 10 मिनिटं चालल्यानं टाईप 2 डायबिटीसचा आजार असलेल्या लोकांच्या शरीरातील साखरेचं प्रमाण कमी होतं. रोज जेवण केल्यानंतर 10 मिनिटे चालणं गरजेचं आहे.

चालण्याचे फायदे
दररोज चालल्याने हृदयासंबंधी आजारांचा धोका टळतो. चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबध्दतेसारखे, पचनाचे विकार कमी होता. मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते. नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधूमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासांवर नियंत्रण मिळवता येते. रोज चलण्याची सवय असेल तर मेंदूसाठी फायदेशीर ठरते. चालण्यामुळे तणाव कमी होते. मुडही फ्रेश राहतो. डिमेंशिया आणि अल्झायमर असे आजार होत नाहीत.

दररोज किती चालले पाहिजे ?
आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी दररोज कमीतकमी अर्धा तास चाललं पाहिजे. 10000 पावलं म्हणजेच 6 ते 7 किलोमीटर चालणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं. चालण्यामुळे शरीराला ऊर्जा प्राप्त होते. प्रमाणापेक्षा जास्त चालण्याची आवश्यकता नाही. करण गरजेपेक्षा जास्त चालल्यानं थकवा जाणवू शकतो.

कोणी किती चाललं पाहिजे
6 ते 17 वयोगटातील लोकांनी 15 हजार पावलं चाललं पाहिजे. 12 हजार पावलंही चालली तरी चालतील. 18 ते 40 वयोगटातील लोकांनी 12 हजार पावलं चालणं फायदेशीर ठरेल. 50 वर्षे वय असलेल्या लोकांनी 10 हजार पावलं चालायला हवं. 60 वर्षावरील लोकांनी 8 हजार पावलं चालणं गरजेचं आहे.

You might also like