हृदयविकाराची भीती वाटते ? जाणून घ्या प्रमुख कारणं आणि प्रकार !

अनेकदा आपल्याला काही किरकोळ दुखणं झालं तर आपण दुर्लक्ष करत असतो. छातीत दुखणं हे हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं. आज आपण याचे प्रकार आणि प्रमुख कारणं जाणून घेणार आहोत.

हृदयविकाराची प्रमुख कारणं पुढीलप्रमाणे –

1) हृदयाला रक्तपुरवठा योग्य पद्धतीनं झाला नाही तर आजार होऊ शकतो.

2) व्यायामाचा अभाव

3) अति ताणतणाव

4) धूम्रपान आणि मद्यपान करण्याची सवय

5) लठ्ठपणा

6) अयोग्य जीवनशैली

7) पौष्टीक आहाराचा अभाव

हृदयविकाराचे प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे –

1) कोरोनरी आर्टरी डिसीज – हा एक असा आजार आहे ज्यात हृदयाला ऑक्सिजन आणि रक्त पुरवणाऱ्या रक्तवाहिन्या संकुचित होतात. कारण त्यांच्या कडांवर प्लेक(फॅटी पदार्थ) जमा होतात. यामुळं हृदयाच्या रक्तपुरवठ्यात अडचण निर्माण होते. याला कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणून ओळखलं जातं. हा हृदयरोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. छातीत दुखणं, धाप लागणं, मळमळ होणं, अचानक चक्कर येणं आणि घाम येणं ही या आजाराची लक्षणं आहेत.

2) हायपरट्रॉफिक कार्डिमायोपॅथी – हा एक अनुवांशिक आजार असून स्नायूंशी संबंधित आहे. या आजारात थकवा, चक्कर येणं, छातीत दुखणं, श्वास घेता न येणं आणि पाय सुजणं ही लक्षणं दिसून येतात.

3) जन्मजात लहान मुलांमध्येही हृदयाशी संबंधित विकार दिसून येतात. (उदा. हार्ट वाल्व्ह आणि वॉल दोष), भूक न लागणं, वजन न वाढणे, अंग निळसर दिसणं, श्वास घेताना अडचण जाणवणं ही नवजात मुलांमध्ये हृदयविकाराची लक्षणं दिसून येतात.

4) कुठल्याही प्रकारच्या विषाणूंचा संसर्ग हृदयापर्यंत पोहोचला तर हृदयविकार होऊ शकतो. त्यामुळं हृदयात जळजळ होणं ही समस्या उद्भवते.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.