Health Tips : लाल रंगाची फळे अन् भाज्यांचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   लाल रंगाच्या फळात आणि भाजीत एक विशेष अँटीऑक्सीडेंट आढळते, जे आपल्या शरीरासाठी अतिशय लाभदायक आहे. लाल रंगाच्या भाज्या आणि फळे जसे की, – टोमॅटो, सफरचंद, डाळिंब, चेरी, स्ट्रॉबेरी, टरबूज, बीट, कांदा, लाल कोबी, करवंद, रासबेरी, रेड बेल इत्यादी. यामध्ये लायकोपीन नावाचे अँटीऑक्सीडंट आढळते, जे कँसर रोखण्यात आणि अनेक आजारांचा धोका कमी करण्यासाठी लाभदायक आहे. लाल रंगाच्या भाज्या आणि फळे यांचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.

लाल भाज्या आणि फळांचे फायदे

1 कँसरपासून बचाव

यातील लायकोपीन एक असे अँटीऑक्सीडेंट आहे जे कँसरपासून वाचण्यासाठी उपयोगी आहे. कँसरच्या पेशी वाढत नाहीत. रिसर्चनुसार, स्किन कँसर, लंग कँसर, कोलन कँसर, ब्रेस्ट कँसर इत्यादी रोखण्यासाठी हे उपयोगी आहे.

2 हृदय निरोगी रहाते

याच्यातील लायकोपीनमुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते. ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहाते. बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतात.

3 इम्यूनिटी वाढते

यातील लायकोपीन आणि व्हिटॅमिन सीमुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.

4 पचनशक्ती वाढते

यामध्ये भरपूर फायबर असल्याने तसेच नैसर्गिक पाणी असल्याने पचनशक्ती मजबूत होते. शरीर थंड आणि हाइड्रेट राहाते.

5 सांधेदुखीत उपयोगी

यातील लायकोपीनमुळे सांधेदुखी, सूज, कमी होण्यास मदत होते.