Health Tips : जर तुम्ही सुद्धा रोज पित असाल गरम पाणी, तर जाणून घ्या यामुळे होणारे ‘हे’ नुकसान

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Health Tips : हे तर आपण सर्व जाणतो की, आपल्यासाठी पाणी किती महत्वपूर्ण आहे. शरीर निरोगी ठेवणे, हायड्रेट ठेवणे आणि शरीराचे सर्व अवयव योग्य प्रकारे काम करत राहण्यासाठी पाणी खुप आवश्यक आहे. डॉक्टरांनुसार, आपल्या शरीराच्या गरजांनुसार रोज 2 ते 4 लीटर पाणी प्यायला हवे. याशिवाय काही लोक सांगतात की, गरम पाणी प्यायल्याने आजार दूर होतात. तुम्हाला गरम पाणी पिण्याचे फायदे तर माहित असतील, परंतु याचे काही साइड इफेक्ट्स सुद्धा होतात. जे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम करतात. त्याबाबत जाणून घेवूयात…

किडनीवर होतो परिणाम
किडनीत एक खास कॅपिलरी सिस्टम असते, जी अतिरिक्त पाणी आणि टॉक्सिन्स शरीराच्या बाहेर काढण्यास मदत करते. गरम पाण्यामुळे किडनीवर सामान्यपेक्षा जास्त जोर पडतो. यामुळे किडनीला सामान्य पद्धतीने आपले फंक्शन करण्यात समस्या निर्माण होते. यासाठी गरम पाणी प्या परंतु सतत पिऊ नका. गरम पाण्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करा.

होठ जळणे
अनेकदा गरम पाणी प्यायल्याने होठ भाजतात. यासाठी डॉक्टर सल्ला देतात की, जेव्हा पाणी प्याल तेव्हा छोटे-छोटे घोट घेत कोमट पाणी प्या.

अंतर्गत अवयवांचे नुकसान
जास्त गरम पाणी प्यायल्याने तोंडाला फोड किंवा तोंडात जळजळ होऊ शकते. सोबतच यामुळे शरीराच्या आतील अवयव सुद्धा प्रभावित होऊ शकतात.