नाश्त्यात खा ‘हा’ पदार्थ ! डायबिटीज, रक्ताची कमतरता आणि बद्धकोष्ठतासारखे 8 आजार होतील दूर, जाणून घ्या

तुम्ही सर्वजण रवा शिरा तर मोठ्या आवडीने खात असाल. रव्याचा शिरा बहुतांश लोकांना आवडतो. परंतु, तुम्ही रव्याचा योग्य पद्धतीने वापर केलात तर अनेक आजार दूर ठेवू शकता. रव्यात अनेक प्रकारची पोषकतत्व असतात, ज्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ई, मिनरल्स इत्यादी घटक असतात. ही सर्व पौष्टिकतत्व शरीरीक क्रिया योग्य पद्धतीने होण्यासाठी खुप जरूरी आहेत.

हे आजार राहतील दूर

1 लठ्ठपणा (Obesity )
सध्या लोकांना खुप वेगाने लठ्ठपणाची समस्या होत आहे. अशावेळी जर रवा वापरून बनवलेले पदार्थ नाश्त्यात सेवन केले, तर वजन हळुहळु कमी होऊ शकते. चांगल्या आरोग्यासाठी रवा जरूर सेवन करा.

2 पचनक्रिया (Human digestive system)
जर तुमची पचनक्रिया बिघडली असेल आणि जेवण सहजपणे पचन होत नसेल, तर तुम्ही दररोज नाश्त्यात रवा वापरून बनवलेले पदार्थ सेवन करा. रव्यात भरपूर प्रमाणात फायबर आढळते, जे पचनक्रिया व्यवस्थित करते आणि तुमचे शरीरसुद्धा ताकदवान बनवते.

3 रक्ताची कमतरता ( Anemia Problem )
ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते, त्यांनी रव्याचे सेवन करणे खुप लाभदायक असते. रव्यात आढळणारे आयर्न आपल्या शरीरात रक्ताची निर्मिती करण्यासाठी उपयोगी ठरते.

4 डायबिटीज ( Diabetes)

ज्या लोकांना डायबिटीजची समस्या आहे. त्यांच्यासाठी सुद्धा रवा वापरून बनवलेले पदार्थ लाभदायक आहेत. रव्यात प्रेसिमिक इंडेक्स आढळतो, ज्यामुळे मधुमेहाच्या रूण्यांना फायदा होतो. जर डायबिटीजच्या रूग्णांनी रवा वापरून बनवलेला उपमा खाल्ला तर त्यांना खुप लाभ होतो.

5 उर्जा, उत्साहाची कमतरता (Fatigue)
शरीरात उर्जा कायम ठेवण्यासाठी व्हिटॅमिन, खनिज आणि अन्य पोषकतत्वांची आवश्यकता असते आणि ही सर्व तत्व रव्यात मोठ्याप्रमाणात असतात.

6 हृदय आणि मुत्रपिंड ( heart & Kidney)
रवा हृदय आणि मुत्रपिंडाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि सोबतच मासपेशींना क्रियाशील करण्यात मदत करतो.

7 कमजोर हाडे ( Weak bones ) 
रवा तुमची हाडे निरोगी ठेवतो. हा हाडांचे घनत्व वाढवतो आणि त्यांना मजबूत व निरोगी ठेवतो.

8 नर्वस सिस्टम (Nervous system)
रवा तुमची नर्वस सिस्टम चांगली ठेवतो. यामध्ये फॉस्फरस, झिंक आणि मॅग्नेशियम असते, नर्वस सिस्टम निरोगी ठेवण्यासाठी उपयोगी ठरते.