रात्रीच्या जेवणानंतर पोटात गॅस होतो का ? जाणून घ्या 3 कारणं आणि 4 सोपे उपाय

पोलिसनामा ऑनलाइन – रात्रीचे जेवण झाल्यानंतर काही लोकांना पोटात गॅस तयार होण्याची समस्या असते. यामुळे चांगली झोप येत नाही. सतत अस्वस्थ वाटतं. पोटात अतिरिक्त गॅस जमा झाल्याने असे होते. कधीकधी यामुळे डोकेदुखीची समस्या होऊ शकते. पोटात गॅस तयार होण्याची कारणं आणि उपाय जाणून घेवूयात.

का होते समस्या
1 पचण्यास जड अन्नपदार्थ खाल्यास पोटात गॅस होतो. बटाटा, वाटाणे, अशा फायबर्स जास्त असलेल्या पदार्थांमुळे गॅस होतो.
2 शरीरातील उर्जेचा वापर अनेकदा पूरेपुर केला जात नाही.
3 काही पदार्थांमध्ये कार्बोहाइड्रेट, फ्रुक्टोज, लॅक्टोज असतात. गॅस तयार करत असलेले घटक या पदार्थामध्ये जास्त असतात. त्यासाठी साबुदाणे, स्प्राऊट्स, ब्रोकोली, कांदा, सोडा, कार्बोनेड सोडा, गहू, बटाटा या पदार्थांचे सेवन योग्य प्रमाणात करावे.

हे उपाय करा

1 दोन वेळच्या जेवणात जास्त अंतर ठेवू नका. भूक लागल्यास अधून मधून काहीतरी खा.

2 सिगारेट, ई-सिगारेट टाळा. यामुळे गॅस होण्याची समस्या उद्भवते. मादक पदार्थांचे सेवन करू नका.

3 जेवल्यानंतर लगेच झोपू नका. झोपपूर्वी बाहेर चालण्याचा 20 मिनिटांपर्यंत प्रयत्न करा.

4 दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्या.