झोपण्यापुर्वी पोटात गॅस मग जाणून घ्या 3 कारणं आणि 4 सोपे उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अनेक लोकांना रात्रीच जेवण झाल्यावरती पोटात गॅस तयार होण्याची समस्या निर्माण होते. पोटभरुन जेवल्यावरही चांगली झोप लागत नाही. या कुशीवरुन त्या कुशीवर जाण्यात काही तास निघून जातात. पोटामध्ये अतिरिक्त गॅस जमा झाल्यामुळे ही समस्या उद्भवते आणि अस्वस्थ व्हायला लागतं. तसेच डोकेदुखीची समस्या सुद्धा निर्माण होऊ शकते. आता आम्ही तुम्हाला पोटात गॅस तयार होण्याची कारणे आणि उपाय सांगणार आहोत.

कारणे
१. पोटात गॅस तयार होणे ही सामान्य प्रक्रिया असते. आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया अन्नाचे पचन करण्यासाठी मदत करत असतात. पोटात अतिरिक्त गॅस तयार झाल्यावरती गॅस पास होण्याच्या मार्गे बाहेर पडतो. जर तुम्ही रात्री जास्त जेवत असचाल तर ही समस्या उद्भवते.

२. तुम्ही जर रात्री कमी जेवला तरी सुद्धा दिवसभरात गॅस पास होण्याची आणि पोट फुगण्याची समस्या निर्माण होते. अन्नाचे पूर्ण पचन होण्यासाठी किमान ६ तास लागू शकतात. पचन सुरळीत न झाल्यास किंवा जास्त उपाशी राहिल्यास ही गॅस पास होतो.

३. जेवताना पचायला जड असलेले अन्नपदार्थ खाल्यास पोटात गॅस होण्याची समस्या उद्भवू शकते. बटाटा, वाटाणे असे फायबर्स जास्त प्रमाणात असलेल्या पदार्थामुळे गॅस होतो. कारण शरीरातील ऊर्जेचा वापर अनेकवेळा पुरेपूर केला जात नाही. काही पदार्थांमध्ये कार्बोहाड्रेड, फुक्ट्रोज, लॅक्टोज असतात. गॅस तयार करत असलेले घटक या पदार्थांमध्ये जास्त असतात. त्यामुळे साबुदाणे, स्प्राऊट्स, ब्रोकोली, कांदा, सोडा, कार्बोनेट सोडा, गहू, बटाटा या पदार्थांचे सेवन कमी करा.

उपाय
१. जेवल्यानंतर लगेच झोपायची सवय योग्य नाही. झोपण्याच्या अगोदर बाहेर २० मिनिटांपर्यंत चालण्याचा प्रयत्न करा.

२. दोन वेळच्या जेवणातील अंतर जास्त असू नये. भूक लागल्यास अधून मधून काहीतरी खात राहा.

३. जास्तीत जास्त पाणी प्या. दिवसात पाण्याचे कमी प्रमाणात सेवन केल्यामुळे तुमचा रात्रीचा शारीरिक त्रास जास्त वाढू शकतो.

४. सिगारेट, ई-सिगारेट या पदार्थांचे सेवन शरीरासाठी नुकसानदायक ठरते. त्यामुळे पोट फुगण्याची समस्या निर्माण होते. परिणामी गॅस तयार होतो. म्हणून मादक पदार्थांचे सेवन करु नका.