मेंदू सदैव सक्रीय ठेवण्यासाठी ‘या’ ५ सवयी आवश्यक

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बौद्धीकरीत्‍या व्यक्ती निरोगी असल्यास त्याचे कामही सुरळीत होते आणि वागणुकही चांगली असते. बौद्धी‍करीत्‍या फिट ठेवण्‍यासाठी जिज्ञासू वृत्‍ती असणे आवश्‍यक आहे. काही क्रिएटीव्‍ह करण्‍याच्या विचारांमुळे विचारांमध्‍ये व्‍यापकता येते. शिवाय मेंदु कार्यक्षम बनतो. मेंदू स्‍वस्‍थ आणि सतत सक्रीय ठेवण्यासाठी काही सवयी आपण लावून घेतल्या पाहिजेत. या सवयी कोणत्या याविषयी आपण माहिती घेवूयात.

गेम्‍स खेळल्‍याने मेंदु स्‍वस्‍थ राहतो. कारण गेम्‍स खेळताना मेंदूला आव्‍हान मिळते. सुडोकू आणि चेससारख्‍या खेळांमुळे वेगाने विचार करण्‍याची क्षमता वाढते तसेच मनोरंजनही होते. रोज केवळ १५ ते २० मिनिटे असे गेम खेळल्‍याने याचा फायदा होतो. हे एक प्रकारचे ब्रेन एक्‍सरसाइजच आहे, असे तज्ज्ञ सांगतात. मेंदूच्या सक्रीयतेसाठी ध्‍यान आवश्य केले पाहिजे. दररोज मेडिटेशनची सवय असलेला माणूस हा बौद्धीकरीत्‍या इतरांपेक्षा अधिक स्‍वस्‍थ असतो. यामुळे शारीरिक आरोग्‍य चांगले राहते व झोपही चांगली येते. बौद्धीकरित्‍या स्‍वस्‍थ राहण्‍यासाठी शरीराबरोबरच मेंदूसाठीही फायदेशीर असा आहार घ्यावा. विशेष करून ऑलिव्‍ह ऑइल व मासे मेंदुसाठी लाभदायक आहेत.

आपले अनुभव मित्रांसोबत शेअर केल्याने स्‍मरणशक्‍ती चांगली राहते. तसेच गोष्‍टी वाचण्‍याच्‍या सवयीमुळेही तुम्‍ही मानसिकरीत्‍या सुदृढ राहतात. काही लोक आपण वाचलेल्‍या गोष्‍टी इतरांना अतिशय मनोरंजक पद्धतीने सांगतात, ज्‍यामुळे त्‍यांची स्‍मरणशक्‍ती चांगली राहते. शारीरिक व्‍यायाम हे एक प्रकारचे बौद्धीक कसरतच असते. यादरम्‍यानच्‍या हालचालीचा सरळ परिणाम मेंदुवर होतो. नियमित व्‍यायाम केल्‍याने आपण मानसिकरीत्‍याही सुदृढ राहतो. फक्‍त ठराविक वेळेनंतर वेगवेगळ्या प्रकारचे व्‍यायाम करावेत, याचा अधिक चांगला परिणाम होतो.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/