दिर्घकाळा तारूण्य टिकवण्यासाठी टाळाव्यात ‘या’ चुका

पोलीसनामा ऑनलाइन टीम – दिर्घकाळ तारूण्य टिकावे असे प्रत्येकाला वाटते. परंतु, जसेजसे वय वाढते तसतसे शरीरात काही बदल वेगाने घडत असतात. कधीकधी वेळेच्या आधीच वार्धक्याची चाहुल लागते. अशा वेळी आपण काहीच करू शकत नाही. यासाठी आतापासूनच काही काळजी घेतली, काही चूका टाळल्या तर दिर्घतारूण्य सहज प्राप्त होऊ शकते. नकळत आपण दिवसभरात काही चुका करतो, त्यांचा आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो. या चूका टाळल्यास तारुण्य दिर्घकाळ आपण टिकवून ठेवू शकतो. या चुका कशा टाळव्यात याबाबतची माहिती येथे देत आहोत.

विविध संशोधनातून असे समोर आले आहे की, पूर्ण झोप न घेतल्याने अकाली वृद्धत्व येऊ शकते. रात्री ७-८ तासांची झोप घेतली नाही तर तणाव, हृदयाशी संबंधित समस्या आणि उच्च रक्तदाबाची समस्या होते. यामुळे अकाली वृद्धत्व येऊ शकते. सतत तणावात राहिल्याने शरीरात काही असे हार्मोन्स तयार होतात ज्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. यामुळे चेहऱ्यावर अवेळी सुरकुत्या येतात. एकाच वेळी अनेक काम केल्याने ऊर्जा जास्त लागते आणि ताण वाढतो. यामुळे मेंदूवर वाईट परिणाम होतो. सतत एकाच ठिकाणी बसून काम केल्याने जेवणाचे पचन होत नाही. अशावेळी लठ्ठपणा वाढतो. याचा आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. दिवसभरात ७ किंवा ८ ग्लासपेक्षा कमी पाणी प्यायल्याने शरीर हायडेट होऊ शकत नाही.

अशा वेळी स्किन डाय होते ज्यामुळे सुरकुत्या येतात. तसेच सकाळची न्याहारी न केल्याने दिवसभर थकवा आणि अशक्तपणा राहतो. याचा त्वचेवर परिणाम होतो. आहारात दूध, दही, पनीर, हिरव्या भाज्या, अंडी, मासे, चिकन, मटन सारखे पदार्थ न घेतल्याने शरीराला आवश्यक न्यूटिशन्स मिळत नाही. यामुळे अकाली वृद्धत्व येते. सनस्क्रीन न लावल्याने सूर्य किरणांचा थेट त्वचेवर परिणाम होतो. यामुळे त्वचेचा रंग आणि मऊपणा कमी होतो. रोज सकाळी व्यायाम न केल्याने शरीर निरोगी राहत नाही. लठ्ठपणा, अपचन, अ‍ॅसिडिटी आणि बध्दकोष्ठतेची समस्या होते. अशावेळी अवेळी म्हातारपण येते. दारू, गांजा, सिगारेट आणि डग्सचा नशा केल्याने शरीरात कॉर्टिसोल हार्मोन तयार होते. हे हार्मोन ताण वाढवते आणि अकाली वृद्धत्व येते.

You might also like