पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे पसरतात जीवघेणे आजार, ‘या’ 11 प्रकारे ठेवा स्वतःला सुरक्षित

पावसाळ्यात दुषित पाण्याचे सेवन टाळल्यास अनेक आजारांपासून बचाव करता येऊ शकतो. पावसाळ्यात दुषित, अस्वच्छ पाणीपुरवठा होतो. नदीमध्ये सांडपाणी, कचरा, घाण हे मिसळल्यामुळे हे पाणी पिणं शरीरासाठी धोकादायक ठरतं. दुषित पाणी प्यायल्यामुळे उलटी, अतिसार, टायफॉइड आणि कावीळ यांसारखे अनेक साथीचे आजार होतात. पावसाळ्यात उकळून थंड केलेले स्वच्छ पाणी प्यावे.

अशी घ्या काळजी

1 पाणी साठवून ठेवू नका.
2 पिण्याच्या पाण्याची भांडी, पाण्याच्या टाक्या, पाईप्स वेळोवेळी स्वच्छ करा.
3 पाण्याची भांडी झाकून ठेवा.
4 पाणी साठवून ठेवल्यास डास निर्माण होतात. डासांमुळे अस्वच्छता पसरून डेंग्यू, मलेरिया यांसारखे आजार पसरतात.
5 पावसात भिजणं टाळा, पावसात छत्री किंवा रेनकोट घेतल्याशिवाय घराबाहेर पडू नका.
6 रोगप्रतिकाशक्ती वाढवण्यासाठी गाजर, हळदीचे दूध, आलं , लसूण, आहारात समावेश करा. उन्हाळा असो किंवा पावसाळा भरपूर पाणी प्या.
7 व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा.
8 व्हिटामीन डी घ्या. बाहेर जाणं शक्य नसेल तर इमारतीच्या गच्चीवर किंवा गॅलरीतून सुर्यप्रकाश अंगावर घ्या.
9 घरच्याघरी 20 ते 30 मिनिटं वेळ काढून व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. व्यायाम रोज केल्याने वजन नियंत्रणात राहाते.
10 जास्तीत जास्त गरम पाण्याचे सेवन करा. जेणेकरून घश्यासंबंधी तक्रारी उद्भवणार नाहीत.
11 बाहेर जाताना मास्कचा वापर, सोशल डिस्टेंसिंगचं पालन न चुकता करा.