फॅशन म्हणून नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीने निवडा ‘या’ प्रकारच्या ब्रा आणि पँटी; डॉक्टरच देताहेत सल्ला; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सध्या आपण मोठमोठ्या विषयांवर बोलत असतो. मात्र, अंतर्वस्त्राचा साधा विषय जरी आला तरी तो जाणूनबुजून टाळला जातो. योग्य माहिती आणि गैरसमजातून गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. पण आता त्याबाबतचे ज्ञानही असणे गरजेचे आहे.

ब्रा आणि पँटी या अंतर्वस्त्राबाबत क्विचितच कोणी बोलत असेल. हा विषय मूळात अवघडल्यासारखाच सर्वांना वाटतो. म्हणून त्यावर जास्त बोलणे टाळले जाते. योग्य ब्रा घातल्यास आणि स्वच्छता ठेवल्यास स्तनांचे (Breast) आरोग्य चांगले राहते. तसेच पँटीही योग्य आकाराची असल्यास आणि स्वच्छता राखल्यास योनीचे (Vagina) आरोग्य चांगले राहते. सध्याच्या काळात अंतर्वस्त्र हाही फॅशनचाच भाग झालाय. पण त्याचे फायदे-तोटेही जाणून घेणे महत्वाचे आहे.

डेली मेलने याबाबत सविस्तर माहिती एका लेखाच्या माध्यमातून दिली. या विषयासंदर्भात आरोग्य तज्ज्ञांचा सल्लाही महत्त्वाचा आहे, असे या लेखात म्हटले आहे. ‘महिलांनी किमान एक वर्षाने इनरवेअर बदलणे गरजेचे आहे. इनरवेअर मशीनमध्ये स्वच्छ होत नसल्याने हातांनी साफ करावे. वॉशिंग मशिनमध्ये इनरवेअर धुतल्याने बॅक्टेरिया मरत नाहीत. उलट बॅक्टेरियामुळे त्वचेला त्रास हाऊ इन्फेक्शन होऊ शकते’, असे ब्रिटीश कॉस्मेटिक सर्जन डॉ. शिरीन लखानी यांनी म्हटले आहे.

‘इंटिमेट हेल्थ केअर एक्सपर्ट’ आणि ‘पेल्व्हिक हेल्थ केअर’ कंपनीच्या एमडी स्टीफनी टेलर यांनी सांगितले, की काही महिला झोपताना किंवा व्यायाम करताना इनरवेअर घालत नाहीत. हे चांगले असून, असे केल्याने योनीला इन्फेक्शन होत नाही.

योनी आणि स्तन यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी? जाणून घ्या…

अशी घ्या तुमच्या ब्रा (Bra) ची काळजी…

–  दिसायला चांगली म्हणजे ती ब्रा चांगली असे म्हणता येणार नाही. ब्रा तुमच्या स्तनांच्या आकाराप्रमाणे निवडावी. ब्राची साईज निवडताना ती जास्त घट्ट किंवा सैल नसावी. बेल्ट जास्त घट्ट नसावा.

–  सिल्क आणि सॅटिन या कापडांच्या ब्रामुळे काही वेळानंतर शरीराला त्रास व्हायला लागतो. ऍलर्जी किंवा पुरळ येण्याची शक्यता असते

–  जीममध्ये जाताना स्पोर्ट्स ब्रा महिला घालतात. या ब्रा व्यायामासाठी चांगली असल्या तरी त्या दैनंदिन वापरासाठी नसतात. व्यायाम करताना कोणत्याही प्रकारची ब्रा घातली तरी व्यायामानंतर बदलावीच कारण, व्यायाम करताना आलेला घाम त्यात शोषलेला असतो.

–  सुती कपड्यामध्ये घाम आणि इतर स्त्राव टिपले जातात आणि त्वचा कोरडी राहते आणि इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी होते

–  प्रेग्नेन्सीनंतर महिलांच्या स्तनामधून स्त्राव बाहेर येत असतो. अशावेळेस ब्रामध्ये हा स्त्राव शोषला जातो.

–  ब्रा स्नायूंना आधार देण्यासाठी घातली जाते. ब्रा आपले स्तन आणि निपल यांना घासत असतात. त्या घर्षणाने इजा होऊ शकते. त्यातही या काळानंतर ब्राचे इलेस्टिक आणि त्याची शिवण निघालेली असेल. ब्रा स्तनांना योग्यप्रकारे आधार देत नाही.

–  जर तुम्ही घरातून बाहेर जाणार नसाल तर ब्रा घालणे टाळा किंवा सैल कंफर्टेबल ब्रा घाला. बाजारात डेली युजसाठी ब्रा उपलब्ध आहेत. झोपताना ब्रा घालणे टाळा असा सल्लाही डॉक्टर देतात.

अशी घ्या तुमच्या पॅन्टी (Panty) ची काळजी…

–  पॅन्टी घेताना फॅशनपेक्षा तिची साईज, आकार, मेटेरियलचा विचार करा

–  पॅन्टीचे कापड जाड असेल तर त्याच घर्षण होण्याने त्रास होईल. मऊ सुती कापडाची पॅन्टी नेहमी चांगली.

–  योनीला इन्फेक्शन असेल तर रात्री झोपताना पॅन्टी न घालण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

–  महिला व्यायाम करताना पॅन्टी घालत नाहीत. हे देखील चांगले असल्याचे त्या सांगतात.

–  जाळीची पॅन्टी दिसायला चांगली असली तरी दररोज वापरू नये. सॅटिनचे कापड ओलावा शोषून घेते. तेही हानीकारक आहे.

–  पॅन्टी 3 महिन्यांनी बदलावी किंवा रोटेशनमध्ये पॅन्टी वापरत असाल तर 6 महिन्यांनी पॅन्टी बदलावी.

–  पॅन्टीचा आकार बदलला, साईज बिघडली, इलास्टिक फीट नसेल तर बदलावी